मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – थोडी कणकण असेल वा ताप आल्यासारखे वाटल्यास लगेच पॅरासिटामॉल घेण्याची सवय अनेकांना असते. बरेच जण स्वत:हून औषध घेत असतात. पण, असे करणे जीवावर बेतू शकत असल्याने पॅरासिटामॉलचे अतिसेवन करू नये. तसेच शक्यतो डॉक्टराच्या सल्ल्यानेच औषध घ्यावे, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
काही लोक सौम्य वेदना असल्यास कोणताही विचार न करता मेडिकल स्टोअरमध्ये जातात आणि स्वतः पॅरासिटामॉल घेतात. पण हे करणं अत्यंत चुकीचं असून याचा तुमच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. पॅरासिटामॉल तुमच्या वेदना तेवढ्यापुरत्या वेळेसाठी दूर करतं पण, हे आरोग्यासाठी अतिशय नुकसानदायक आहे. यासंदर्भात नुकतेच एक संशोधन पुढे आले आहे.
दी बीएमजे संस्थेने केलेल्या संशोधनात एकूण १५ हजार १३४ लोकांचा सहभाग होता. अभ्यासात ६९ वेगवेगळ्या औषधांच्या परिणामांचे निरीक्षण करण्यात आले. त्यानुसार, पाठदुखी आणि ऑस्टियोआर्थरायटिसच्या उपचारांसाठी पॅरासिटामॉल घेतल्याने जीवनशैलीत सुधारणा होत नाही. वेदना कमी करण्यासाठी पॅरासिटामॉलचा प्रभाव तितका प्रभावी नव्हतास, असे संशोधनात समोर आले. या औषधाच्या जास्त वापरामुळे यकृत खराब होण्याचा धोका वाढतो, असेही संशोधकांनी सांगितले आहे.
मज्जासंस्थेशी संबंधित समस्या वाढल्या
पेनकिलर म्हणजे वेदनाशामक औषधांमुळे वेदना कमी होतात पण, त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम होतात. या औषधांचा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल सिस्टिमवर दुष्परिणाम होऊन यामुळे मळमळ, अपचन, उलट्या आणि जुलाब यांसारखी लक्षणे दिसून आली. थकवा, चक्कर येणे आणि डोकेदुखी यासारख्या मज्जासंस्थेशी संबंधित समस्याही दिसून आल्या. विशेषतः ज्या लोकांना पाठीच्या खालच्या भागात तीव्र वेदना होत्या आणि त्या लोकांनी या औषधांचे जास्त सेवन केल्याचेही संशोधनात समोर आले आहे.
Paracetamol Tablet Research Report Painkiller