पन्ना-पाचू वापरायचा आहे?
या टीप्स नक्की वाचा…
पन्ना पाचू Emrald हे हिरवट पांढऱ्या रंगाचे बुध ग्रहाचे रत्न आहे. उजव्या हाताच्या करंगळीमध्ये ते धारण करतात. चांदी अथवा सोने पंचधातू, अष्टधातु मध्ये पेंडंट स्वरूपातही वापरतात.
पाचू अथवा पन्नाचे प्रकार
झांबिया, कोलंबिया, सपोटा, रशियन बॅरल, मर्गज, चेतक, ONEX (पन्ना सारखा दिसणारा), हिरवा हकिक हे प्रकार मिळतात. तज्ज्ञांच्या सल्ल्याने तपासून घ्यावे. ए ग्रेड पन्ना ठिसूळ परंतु आकर्षक LUSHGREEN असतो. किंमतीला बर्यापैकी महाग असतो. चौकट ओव्हल (पैलूदार), षटकोनी (पैलूदार) अशा आकारात मिळतो.
कुणी वापरावा
कुंडलीमध्ये बुध, ग्रह 6,8,12 भावात असल्यास
किंवा
बुध, ग्रह, राहू अथवा केतू युतीत असल्यास
किंवा
कुंडलीत बुध ग्रहाची अंतर्दशा अथवा महादशा सुरू असल्यास.
हे लक्षात ठेवा
पन्ना सोबत पुष्कराज पोवळे मोती ही रत्ने वापरू नयेत. पन्ना रत्नाबाबत फक्त व्यवसाय करणाऱ्यांनी पन्ना वापरावा, असा गैरसमज आहे. विविध कारणांसाठी पन्ना वापरला जातो. कोणतेही रत्न तज्ज्ञांच्या सल्ल्याने विकत घेऊनच वापरावे.

व्हॉटसअॅप – 9373913484