मुंबई – भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. मुंडे या दरवर्षी भगवान गडावर दसरा मेळावा घेतात. आपल्या समर्थकांशी संवाद साधतात. सध्या त्या भाजपमध्ये प्रचंड नाराज असल्याचे बोलले जाते. त्यांना पक्षांतर्गत वारंवार डावलले जात आहे. त्यांची नाराजी वेळोवेळी दिसूनही आली आहे. त्यामुळे यंदाच्या त्यांच्या दसरा मेळाव्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर त्यांनी यासंदर्भात एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. त्या व्हिडिओची सर्वत्र चर्चा होत आहे. हो… तुम्ही सांगायचे मी करायचे, आपला दसरा आपली परंपरा!! अशा आशयाचा या व्हिडिओ आहे. बघा काय म्हणताय त्या (व्हिडिओ)
https://twitter.com/Pankajamunde/status/1448001859692765186