नाशिक – पंचवटी विभागाअंतर्गत पंचवटी जलशुध्दीकरण केंद्र येथील ३० लक्ष लिटर्स क्षमतेच्या जलकुंभाचे उर्ध्ववाहिनीवर जोडणीचे काम (cross connection) करणे आवश्यक आहे. सदरचे काम शुक्रवार, दि. १०/६/२०२२ रोजी हाती घेण्यात येणार आहे. सदर जलकुंभावरुन रामवाडी जलकुंभ भरणा होत असल्याने सदर जलकुंभावरुन होणारा पाणीपुरवठा शुक्रवार, १०/६/२०२२ रोजीचा दुपारचा व सायंकाळचा पाणी पुरवठा होणार नाही व शनिवार दि.११/६/२०२२ रोजीचा सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल अशी माहिती महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
हा आहे भाग
प्रभाग क्र.६ मधील रामवाडी परिसर, आदर्शनगर, कौशल्यानगर, बुरकुलेनगर, कोठारवाडी, रामनगर, बच्छाव हॉस्पीटल परिसर, कलाआई मंदिर परिसर, नागरे मळा, क्रांतीनगरचा काही भाग, तळेनगर, उदय कॉलनी काही भाग, मोरे मळा काही भाग, तुळजाभवानी नगर, रामकृष्णनगर, भावबंधन मंगल कार्यालयाजवळील काही भाग इत्यादी परिसरात तसेच प्र क्र. ५ मधील दत्तनगर, कुमावत नगर, शिंदेनगर, नवनाथनगर, द्रोणागिरी, मधुबन कॉलनी, जाधव कॉलनी, जाणता राजा कॉलनी, भन्साळी मळा, रोहिणी नगर, नवरंग मंगल कार्यालय परिसर, पेठ नाका व मखमलाबाद नाका परिसर, इंद्रकुंड, मालेगाव स्टँड व चिंचबन परिसर तसेच प्र क्र. ४ मधील पेठ रोड कॅनॉललगतचा परिसर, हरीओमनगर, पेठरोड वजनकाटा जवळील परिसर, फुलेनगर परिसर, विजय चौक, राहूलवाडी, भराडवाडी, लक्ष्मणनगर, वडारवाडी, पेठ रोडवरील शनी मंदिरासमोरील परिसर, दिंडोरी रोडवरील महालक्ष्मी टॉकीजमागिल रामनगर परिसर, लोकसहकारनगर, आदित्यकुंज सोसा ते युनियन बँक ते निमाणी पर्यंतचा परिसर, इत्यादी ठिकाणी शुक्रवार, १०/६/२०२२ रोजीचा दुपारचा व सायंकाळचा पाणी पुरवठा होणार नाही व शनिवार दि.११/६/२०२२ रोजीचा सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल अशी माहिती देण्यात आली आहे.