नाशिक – नाशिकरोड विभागात मुक्तीधाम जलकुंभावरुन येणारी मुख्य वितरण वाहीनीला मोठयाप्रमाणात गळती सुरु झाल्यामुळे दुरुस्तीचे काम सुरु केले आहे. परंतु कामाचे स्वरुप मोठे असल्याने कामास विलंब लागणार आहे. त्यामुळे नाशिकरोड विभागातील प्र.क्र. १९ मधील सिन्नर फाटा परीसरात स्टेशन परिसरात तसेच प्र.क्र. २२ मधील खर्जुल मळा गाडेकर मळा परीसरात शुक्रवार दिनांक १ एप्रिल रोजीचा सकाळ सत्राचा पाणी पुरवठा होणार नाही. दुपार सत्र व सांयकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल, तरी याची नागरीकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे असे आवाहन नाशिक महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.