पंढरपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देवळात आरतीनंतर प्रसाद वाटप सुरू झाले आणि काही क्षणात प्रसाद संपला, तर त्याचे कुणाला आश्चर्य वाटणार नाही. पण एका देवळात आज अर्ध्या तासात एक टन द्राक्षे चक्क गायब झाली. ही घटना पंढरपूरच्या विठ्ठल रुख्मिणी मंदिरातील असून ही सर्व द्राक्षे सजावटीसाठी वापरण्यात आली होती. या घटनेची आता संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा रंगलेली आहे.
शुक्रवारी आमलिका एकादशी होती. त्यानिमित्ताने पंढरपुरात भाविकांनी विठ्ठल रुख्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यात चक्क १ टन द्राक्षांची सजावट केली होती. पण भाविकांना दर्शनासाठी आत सोडल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात एक टन द्राक्षे गायब झाली. सकाळी सहा ते साडेसहा या अर्ध्या तासात हे सारे घडले. थोडी थोडकी नव्हे तर अख्खी १ टन द्राक्षे गायब झाली आणि एकही द्राक्ष तिथे शिल्लक नव्हते. केवळ अर्ध्या तासात ही द्राक्षे कशी गायब झाली, याचा तपास सुरू आहे आणि चर्चाही सुरू आहे. कारण ज्या ठिकाणी दर्शनाची रांग होती तेथून ही द्राक्षे बाहेर लावण्यात आलेली होती.
सजावटीसाठी द्राक्षे
पुणे आणि बारामती येथील भाविक बाबासाहेब शेंडे, पुनम शेंडे आणि सचिन चव्हाण यांनी गाभाऱ्यात द्राक्षांची सजावट केली होती. यासाठी हजार किलो द्राक्ष त्यांनी वापरली. आपल्या बागेत पिकलेली द्राक्ष विठुरायाच्या चरणी अर्पण करण्यासाठी भाविक येत असतात. मात्र इथे तर गाभाऱ्यात संपूर्ण सजावटच द्राक्षांची करण्यात आली होती.
यामागे कोण आहे?
पंढरपूरच्या विठ्ठल रुख्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यातून एक टन द्राक्षं अचानक गायब होणं आश्चर्यकारक मानलं जात आहे. पण यामागे कोण आहे, याचा तपास लावण्याची मागणी विठ्ठल भक्तांनी केली आहे. मंदिर प्रशासनाने यामध्ये विशेष लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. कारण ज्या भाविकांनी श्रद्धेने ही द्राक्ष दिली त्यांच्या भावना दुखावण्याचा हा प्रकार असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
????????????
श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने आज आमलकी एकादशी निमित्त श्री.विठ्ठल व श्री.रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात सुंदर व मनमोहक अशी द्राक्ष्याची आरास करण्यात आली आहे…
???????????? pic.twitter.com/MkXKhQzAxw— Vitthal Rukmini Today darshan (@PandharpurVR) March 3, 2023
Pandharpur Viththal Temple 1 Ton Grapes Disappear