नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आषाढी वारीसाठी पंढरपूरला स्वतःच्या वाहनाने जाणाऱ्या वाहनांना टोल माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पण, ही टोल माफी कशी मिळेल, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यासंदर्भात आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
नाशिक शहरातून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना टोल माफीसाठी पास मिळणार आहे. यासंदर्भात नाशिक पोलिस आयुक्तालयाकडून पास मिळणार आहे. राज्य सरकारने ७ जुलै रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार, ७ जुलै ते १५ जुलै या कालावधीमध्ये पंढरपूर येथे जाताना व येताना भाविक तसेच वारकऱ्यांच्या जड आणि हलक्या वाहनांसाठी पथकरांतून सवलत देण्यात आलेली आहे. पंढरपूर येथे आषाढी वारीसाठी हलक्या व जड वाहनांद्वारे जाणाऱ्या भाविकांनी त्यांच्या वाहनांसाठी पासेस उपलब्ध करून घ्यावेत. नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील १३ पोलीस स्टेशनच्या माध्यमातून सदरचे पास वितरित केले जात आहेत. तरी संबंधित पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारे भाविक आणि वारकऱ्यांनी ते राहत असणाऱ्या पोलीस स्टेशन येथे जाऊन त्यांच्या वाहनांसाठी पास उपलब्ध करून घ्यावेत, असे आवाहन नाशिक पोलिस आयुक्तांनी केले आहे.
Pandharpur Ashadhi Vari Vehicle Toll Free passes Nashik City