नाशिक – पंचवटी एक्सप्रेसला चाकरमान्यांसाठी एमएसटी पास व इतर प्रवाशांना सामान्य तिकीट देण्यास २५ डिसेंबर पासून रेल्वे प्रशासनाने परवानगी दिली आहे. सदर पास हा फक्त पंचवटी एक्सप्रेस पुरता मर्यादीत राहिल. त्यासाठी सहा डब्बे जनरल करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर रेल्वे प्रशासनाने ही सेवा बंद केली होती. त्यानंतर रेल्वे सुरु करण्यात आले तरी आरक्षित तिकीट शिवाय रेल्वेत प्रवास करता येत नव्हता. या बंधनामुळे मनमाड, लासलगांव, निफाड, नाशिक, इगतपुरी येथून मुंबईकडे रोज प्रवास करणा-यांचे हाल होत होते. पण, प्रशासनाने आता पंचवटी एक्सप्रेससाठी परवाणगी दिली असून इतर रेल्वेलाही हळूहळू ही परवाणगी देण्यात येणार आहे.