पुणे – परमनंट अकाऊंट नंबर अर्थात पॅन कार्ड हा अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे. बँक अकाऊंट उघडण्यापासून, गुंतवणूक करण्यासाठी तसेच कोणत्याही मोठ्या आर्थिक व्यवहारासाठी पॅन कार्डची गरज लागतेच. तुमचे पॅन कार्ड हरवले असेल, खराब झाले असेल तर तुम्हाला टेन्शन येणे साहजिक आहे. पण आता तुम्हाला घाबरण्याची काहीही आवश्यकता नाही. तुम्ही घरबसल्या डुप्लिकेट कार्डसाठी अर्ज करू शकता. चला तर पाहूया याची प्रोसेस…
ऑनलाइन डुप्लिकेट पॅन कार्ड मिळवण्यासाठी फक्त हे करा…
– सर्वप्रथम https://www.onlineservices.nsdl.com/paan/ReprintEPan.html या संकेतस्थळावर जा.
– त्यावर क्लिक केल्यावर एक नवीन विंडो ओपन होईल. त्यावर आपला पॅन नंबर, आधार नंबर आणि जन्मतारीख टाकणे आवश्यक आहे. त्यानंतर चेक बॉक्स वर क्लिक करा.
– ओटीपीचा पर्याय विचारला जाईल. तिथे तुम्ही मोबाईल नंबर किंवा इ मेल आयडी, या दोघांपैकी कोणताही एक पर्याय निवडू शकता. यासाठी ओरिजिनल पॅन कार्डसोबत यापैकी काहीतरी एक रजिस्टर असणे आवश्यक आहे.
– जनरेट ओटीपी वर क्लिक केल्यावर तुम्हाला ओटीपी मिळेल. तो टाकून सबमिट बटणावर क्लिक करायचे आहे. हा ओटीपी 10 मिनिटेच व्हॅलीड असतो, हे मात्र लक्षात ठेवा.
– ओटीपी टाकल्यानंतर नाममात्र शुल्क भरावे लागते. त्याचवेळी मोबाइलवर एक मेसेज येईल. त्यात दिलेल्या लिंकवरून ई पॅन डाऊनलोड करता येईल.
– कार्ड पुन्हा प्रिंट करून ते घरपोच मिळावे यासाठी देशातल्या देशात 50 रुपयांचे शुल्क ऑनलाइन भरावे लागते. तर भारताबाहेर कार्ड पाठवायचे असेल तर 959 रुपये मोजावे लागतील. पैसे भरल्यावर तुमच्या रजिस्टर्ड पत्त्यावर कार्ड घरपोच मिळेल.
ही सुविधा कोणासाठी?
तुमच्या ओरिजिनल कार्डावरील माहितीपेक्षा नवीन कार्डात वेगळी काही माहिती नसेल तर तुम्ही ही सुविधा घेऊ शकता.