मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पन्हाळा किल्ल्यावरील १३ डी थिएटरचे लोकार्पण व पन्हाळगडाचा रणसंग्राम या लघुपटाचे अनावरण…शिवकालीन पुनर्निर्मित पहिला किल्ल्याची घोषणा

by India Darpan
मार्च 7, 2025 | 6:32 am
in मुख्य बातमी
0
GlXwHMCaMAAwTHm 1920x904 1

कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांपैकी पन्हाळगड हा पहिला शिवकालीन पुनर्निर्मित किल्ला असेल. तसेच जागतिक वारसास्थळ म्हणूनही पहिला किल्ला अशी ओळख निर्माण करेल़ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. त्यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा किल्ल्यावरील १३ डी थिएटर चे लोकार्पण व पन्हाळगडाचा रणसंग्राम या लघुपटाचे अनावरण झाले त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ. विनय कोरे, आमदार अशोकराव माने, आमदार अमल महाडिक, आमदार राहुल आवाडे, आमदार शिवाजी पाटील, आमदार गोपिचंद पडळकर, माजी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., प्रांताधिकारी समीर शिंगटे, पन्हाळा नगरपालिका मुख्याधिकारी चेतन माळी आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पन्हाळगडावर अतिशय सुंदर अशा प्रकारच्या १३ डी शोचे उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपण या ठिकाणी आहोत. शिवराय आपले आराध्य दैवत आहेत. या सर्व इतिहासामध्ये पन्हाळगडचे महत्त्व वेगळे आहे. पन्हाळगडचा इतिहास या १३ डी च्या माध्यमातून जगता येणार आहे. यातील महत्त्वाच्या प्रसंगातून युद्धाच्या रणभूमीवर आपण आहोत अशा प्रकारचा अनुभव मिळतो. शिवकालीन इतिहास केवळ वाचण्यापुरता नाही तर तो जगण्याकरताही आहे. ज्या तज्ज्ञांनी हे काम केलं त्यांचे आभार मुख्यमंत्र्यांनी मानले. पन्हाळगडावर येऊन हा सिनेमा पाहवा, असे आवाहनही त्यांनी केले.

येत्या पंधरा दिवसांत जोतिबा प्राधिकरणास मान्यता देण्याची घोषणा
आमदार विनय कोरे यांच्या पुढाकाराने जोतिबा मंदिर विकास आराखडा अतिशय सुंदर तयार झाला आहे. त्याला मान्यता दिली आहे पण त्याचं प्राधिकरण झालं पाहिजे ही मागणी आहे. यावर बोलताना येत्या पंधरा दिवसांमध्येच प्राधिकरण स्थापन करून देतो अशी घोषणा त्यांनी केली. मुख्यमंत्री म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले जागतिक वारसास्थळ म्हणून नॉमिनेट केलेले आहेत. याबाबत दुसरे सादरीकरण करण्याकरता मे २०२५ मध्ये मी स्वतः पॅरिस येथे जाणार आहे. महाराजांचे किल्ले आहेत हा आपला वारसा आहेच आता तो जागतिक वारसा झाला पाहिजे. येथील जोतिबा मंदिर आणि पन्हाळा किल्ला या दोन्ही मागण्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी आमदार विनय कोरे यांनी शिलाहार राजवटीच्या काळातील सोन्याची मुद्रा भेट देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी १३ डी थिएटर आणि परिसराचे कौतुक करून सर्व विधानसभा सदस्यांना या ठिकाणी भेट देण्यासाठी आणू असे सांगितले. आमदार विनय कोरे यांनी प्रस्ताविकामध्ये पन्हाळा किल्ल्याचा इतिहास आणि महत्त्व अधोरेखित केले. पन्हाळा पुन्हा आहे तसा उभा करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांनी आभार मानले. कार्यक्रमात विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचा राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल सत्कार केला. माजी नगराध्यक्षा रुपाली धडेल यांनी आभार मानले.

पन्हाळगडचा रणसंग्राम लघुपट व १३ डी थिएटरचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पन्हाळगड येथे कोनशिला अनावरण व फीत कापून लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी थिएटरच्या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आलेली शिवकालीन शस्त्रे, मुद्रा, नाणी, शिवरायांची वेशभूषा आदींची पाहणी करून माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी पन्हाळगडाच्या इतिहासाबाबत माहिती देणारी चित्रफीत पाहून पन्हाळगडाचा रणसंग्राम हा लघुपट पाहिला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस व विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांना चांदीची तलवारही भेट देण्यात आली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जैन साध्वी प.पू. सुशीलकंवरजी आणि वाणीभूषण प्रीतिसुधाजी म.सा. यांचा आज ६४ वा दीक्षा वर्धापन दिन…देवळाली कॅम्प येथे दोन दिवस विविध कार्यक्रम

Next Post

आता राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये केमोथेरपीची सुविधा उपलब्ध होणार

Next Post
विधानभवन010 1024x513 1

आता राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये केमोथेरपीची सुविधा उपलब्ध होणार

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींच्या कार्याला गती प्राप्त होईल, जाणून घ्या, बुधवार, १८ जूनचे राशिभविष्य

जून 17, 2025
Untitled 49

घोलप, बडगुजर यांच्यासह या दोन माजी महापौर व नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

जून 17, 2025
Corruption Bribe Lach ACB

मंडळ अधिकारी यांच्या नावे २० हजार रुपयाची लाच घेतांना एजंट एसीबीच्या जाळ्यात

जून 17, 2025
farmer

राज्याच्या कृषि क्षेत्राच्या या धोरणाला मंत्रिमंडळाची मंजूरी…हे प्रकल्प पुढे नेण्यास होणार मदत

जून 17, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

नाशिकमधील या क्लस्टरसाठी २९ हेक्टर ५२ आर. जमीन…मंत्रिमंडळाचा निर्णय

जून 17, 2025
उच्च व तंत्र शिक्षण विभागातील ५०० हून अधिक प्राध्यापकांना दिले जाणार प्रशिक्षण 1 1 1024x684 1

आता क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण…

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011