नवी दिल्ली – पॅनकार्ड क्रमांक हा दहा आकडी असून त्यास अल्फान्यूमेरिक नंबर म्हणून संबोधले जाते. पॅनकार्डवर जन्मतारखेच्या बरोबर खाली दहा आकडी पॅन क्रमांक असतो. या अल्फान्यूमेरिक नंबरमध्ये गुप्त माहिती असून ती प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी असते. त्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.
आर्थिक व्यवहारांकरिता सध्या पॅनकार्ड अनिवार्य झाले आहे. पॅनकार्डचा वापर एक अधिकृत ओळखपत्र म्हणून केला जातो. जर तुम्ही एखाद्या कॉर्पोरेट ठिकाणी काम करत असाल तर पगारासाठी तुमच्याकडे पॅनकार्ड असणे आवश्यक आहे.
जन्मतारखेचा बरोबर खाली असलेल्या पॅन क्रमांकाची सुरुवात इंग्रजी आकड्यांनी होते. आयकर विभागाच्या माहितीनुसार, कोणत्याही पॅन क्रमांकाची सुरुवात इंग्रजी अल्फाबेटने झालेली असते, त्यात AAA पासून ZZZ पर्यंत कोणत्याही तीन अक्षरांचा समावेश असतो. अक्षरे कोणती असतील याचा निर्णय आयकर विभाग घेत असतो.









