पालघर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – श्रद्धा खून प्रकरणासारखी आणखी एक घटना पालघरमध्ये समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या लिव्ह-इन पार्टनरची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह पलंगावर लपवून ठेवला. हे कृत्य करुन तो पळून गेला. नालासोपारा येथील विजय नगर भागातील एका फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. पोलिसांनी संपूर्ण खोली शोधली पण मृतदेह सापडला नाही, मग बेड शोधला. बेड उघडताच महिलेचा विकृत मृतदेह पाहून सर्वांनाच धक्का बसला.
पालघर तुळीज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नालासोपारा येथील विजय नगर भागातील एका फ्लॅटमधून पीडित मेघा शहा (वय ३७) हिचा विकृत मृतदेह सापडला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेला तिचा लिव्ह इन पार्टनर हार्दिक याला अटक करण्यात आली आहे.
आरोपीला ट्रेनमधून पकडले
लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला तुळीज पोलिसांनी मंगळवारी अटक केली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीला मध्य प्रदेशातील नागदा येथे रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचार्यांनी ट्रेनमधून पकडले. आरोपी बेरोजगार आहे. दोघांमध्ये अनेकदा भांडण होत असे. अशाच एका वादानंतर आरोपीला आपला राग आवरता आला नाही आणि रागाच्या भरात त्याने मैत्रिण मेघाची हत्या केली. तिचा मृतदेह पलंगामध्ये लपवून ठेवला. तो घरातील वस्तू पटकन विकत होता. जेणेकरून काही पैसे त्याला मिळतील. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
पळून जाण्यापूर्वी बहिणीला मेसेज
आरोपीने आपल्या बहिणीलाही हत्येबद्दल संदेश दिला आणि पळून जाण्यापूर्वी फ्लॅटमधील फर्निचर विकले, अशी बातमी पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली. भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
दिल्लीतही आणखी एक हत्याकांड
दरम्यान, दिल्लीत श्रद्धा सारखेच आणखी एक हत्याकांड समोर आले आहे. एका व्यक्तीने एका मुलीची हत्या करून तिचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. प्राथमिक तपासानुसार, ही घटना कश्मीर गेट ISBT क्षेत्राजवळ घडली. जिथे आरोपी साहिल गेहलोत याने मुलीचा कारमध्ये गळा दाबून खून केला. त्यानंतर आरोपीने तिचा मृतदेह उत्तम नगरजवळील त्याच्या गावी नेऊन त्याच्या ढाब्याच्या फ्रीजमध्ये ठेवला.
Palghar Live in Partner Murder Like Shraddha Crime