पालघर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पतीचे दुसऱ्या विवाहित महिलेसोबत अनैतिक संबंध होते. पती त्या महिलेसोबत पळून गेला. याप्रकाराने पत्नीचा संताप अनावर झाला. तिकडे पळून गेलेल्या महिलेचा पतीसुद्धा सूडाच्या आगीत जळत होता. पत्नीने त्या महिलेच्या पतीला सोबत घेत स्वतःत्या पतीचे हत्याकांड घडवून आणले. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील बांधनपाडा भागात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पत्नीसह पाच आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करीत आरोपींना अटक केली.
संतोष रामा टोकरे असे हत्या करण्यात आलेल्या 35 वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. त्याचे एका विवाहित महिलेसोबत अवैध संबंध होते. इतकेच नाही पती त्या महिलेला पळवून घेऊन आला होता. यामुळे आरोपी महिलेला खूप संताप आला होता. तर दुसरीकडे पळून आलेल्या महिलेचा पतीही कमालीचा संतापला होता. सूडभावनेतून पत्नीने महिलेच्या पतीसोबत संपर्क साधला. त्यानंतर दोघांनी मिळून पद्धतशिरपणे पतीच्या खुनाचे नियोजन करीत योजनाबद्ध पद्धतीने पतीचा खून केला.
आठवडाभरापूर्वी नियोजन
एक, पतीने धोका दिल्याने बदला घेण्यासाठी पत्नीने ही हत्या केली. तर दुसरा पतीचे प्रेयसीचे पतीसोबत प्रेमसंबंध कायम ठेवण्यासाठी आरोपी महिलेने पतीला मार्गातून दूर केले. हत्येच्या आठवडाभरापूर्वी दोघांनी हत्येचे पद्धतशीर नियोजन केले. यानंतर संतोष टोकरे गाढ झोपेत असताना धारदार शस्त्राने गळा चिरून आणि डोक्यात वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. असल्याने संतापलेल्या पत्नीने पतीच्या प्रेयसीच्या नवऱ्याच्या मदतीने त्याची हत्या केल्याची घटना पालघरमध्ये उघडकीस आली आहे.
अनैतिक संबंधांची सर्वत्र कीड
अनैतिक संबंधांची कीड सर्वत्र पसरली आहे. पूर्वी असे प्रकार मोठ्या शहरांपूर्तेच मर्यादित होते. पण, आता लहान शहरांपर्यंत देखील ही दाहकता पोहोचली आहे. सातत्याने अशा घटना उघडकीस येत आसून हा प्रकार कुटुंब व्यवस्थेवरच आघात करणारा ठरला आहे.
Palghar Crime Husband Wife Murder Police Investigation