इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पाकिस्तानी यूट्यूबर सना अमजदने आणखी एक मनोरंजक व्हिडिओ शेअर केला आहे जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ भारतातही चर्चेचा विषय बनला आहे. देशातील आर्थिक संकटानंतर एक पाकिस्तानी तरुण कसे आपलेच पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या विरोधात घोषणा देत आहे, हे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. आणखी आश्चर्याची गोष्ट म्हणजे या व्हिडिओमध्ये या युवक भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींची जोरदार प्रशंसा करत आहे. तसेच, भारत-पाकिस्तान फाळणीलाही तो दोष देत आहे.
यूट्यूबर सना अमजदने पोस्ट केलेल्या व्हायरल व्हिडिओमध्ये, एक पाकिस्तानी तरुण देशातील चालू घडामोडींवर शेहबाज शरीफ सरकारच्या विरोधात घोषणा देताना दिसत आहे आणि म्हणत आहे की, जर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पाकिस्तानात राज्य असते तर वाजवी किंमतीत वस्तूंची खरेदी-विक्री झाली असती.
व्हिडिओमध्ये यूट्यूबर सना एका स्थानिक व्यक्तीला विचारताना दिसत आहे की, ‘पाकिस्तान से जिंदा भागो, चाहे इंडिया चले जाओ’ ही घोषणा ठिकठिकाणी का दिली जात आहे? यावर तो युवक उत्तर देतो की, माझा पाकिस्तानात जन्म झाला नसता. माझा जन्म भारतात झाला असता तर मला अशा त्रासाला सामोरे जावे लागले नसते.
युवकाने सांगितले की फाळणी झाली नसती तर वाजवी किमतीत जीवनावश्यक वस्तू मिळाल्या असत्या. आपल्या मुलांना दररोज दोनवेळचे जेवणही देता आले असते. माझी इच्छा आहे की पाकिस्तान भारतापासून वेगळा झाला नसता तर, आम्ही टोमॅटो 20 रुपये प्रति किलो, चिकन रुपये 150 रुपये किलो आणि पेट्रोल 50 रुपये प्रति लिटर दराने खरेदी करत असतो. आम्हाला इस्लामिक राष्ट्र मिळाले हे दुर्दैव आहे, परंतु आम्ही येथे इस्लामची स्थापना करू शकलो नाही, असे युवकाने स्पष्ट केले.
युवक म्हणाला की, नरेंद्र मोदींशिवाय पंतप्रधानपदी आम्हाला कोणीही नको आहे, मोदी आमच्यापेक्षा खूप चांगले आहेत, त्यांचे लोक त्यांचा खूप आदर करतात आणि त्यांचे अनुसरण करतात. नरेंद्र मोदी असते तर आम्हाला नवाझ शरीफ, बेनझीर किंवा इम्रान यांची गरज नसती, अगदी माजी लष्करी शासक जनरल परवेझ मुशर्रफ यांचीही गरज नव्हती. आम्हाला फक्त पंतप्रधान मोदी हवे आहेत कारण तेच देशातील सर्व खोडकर घटकांना तोंड देऊ शकतात. भारत ही सध्या जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. आणि पाकिस्तान कुठेच नाही. मी मोदींच्या राजवटीत राहायला तयार आहे. मोदी हे महान व्यक्ती आहेत, ते वाईट व्यक्ती नाहीत. भारतीयांना माफक दरात टोमॅटो आणि चिकन मिळत आहे, असे तो गौरवाने म्हणाला.
शहबाज सरकारवर निशाणा साधताना युवक म्हणाला की, जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना रात्री खाऊ घालू शकत नाही, तेव्हा तुम्ही त्या देशाला उद्ध्वस्त करायला सुरुवात करता. डोळ्यात अश्रू आणून तो युवक म्हणाला की, मी सर्वशक्तिमानाकडे प्रार्थना करतो की आम्हाला मोदी द्या आणि त्यांनी आमच्या देशावर राज्य करावे. पाकिस्तानी नागरिकांनी भारताशी तुलना करणे थांबवण्याची गरज आहे. कारण दोन्ही देशांमध्ये तुलनाच होऊ शकत नाही, असे त्याने स्पष्ट केले.
https://twitter.com/AdityaRajKaul/status/1628635652706410496?s=20
Pakistani Youth PM Modi Slogan Video Viral