इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियादरम्यान सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी अशी घटना घडली की, ती पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. ऑस्ट्रेलियाने या सामन्यावर मजबूत पकड बनवली आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पंच अहसान रझा यांचा एक निर्णय सोशल मीडियावर मिम झाला आहे. अहसान रझा यांनी ज्या चेंडूवर एलबीडब्ल्यू बाद दिले, त्या चेंडूवर क्रिकेटची कमी माहिती असलेल्या व्यक्तीनेसुद्धा त्याला बाद दिले नसते.
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाकिस्तानचा यष्टीरक्षक मोहम्मद रिझवानविरुद्ध एलबीडब्ल्यूची अपिल करण्यात आली. अहसान रझा यांनी ऑस्ट्रेलियाच्या बाजूने निर्णय दिला. नॉन स्ट्रायकर एंडवर उभा असलेला कर्णधार बाबर आझमसुद्धा या निर्णयामुळे आश्चर्यचकित झाल्याचे पाहायला मिळाले. मोहम्मद रिझवान याने विलंब न लावता डीआरएस घेतला. रिप्लेमध्ये दिसले की चेंडूटा ऑफ स्टंपच्या बाहेर टप्पा पडला होता. इम्पॅक्टसुद्धा आउटसाइड होता. चेंडू स्टंपच्या बाहेर चालला होता. त्यानंतर पंच रझा यांना आपला निर्णय बदलावा लागला. परंतु त्यांचा हा निर्णय चांगलाच चर्चेत राहिला असून, त्यांच्यावर टीका होत आहे.
बघा हा व्हिडिओ
https://twitter.com/NixaPor/status/1503311549061947393?s=20&t=n_3_-_VhRPohTkNeCGDQ1A