नवी दिल्ली – अनेक शासकीय कार्यालये, खासगी संस्था, कंपन्या तथा कारखाने आपल्या कर्मचाऱ्यांचा ड्रेस कोड तयार करतात. यामागे संस्थेची ओळख किंवा शिस्त पालन हा उद्देश असतो. भारतात देखील पोलिसांपासून ते रिक्षाचालकाने पर्यंत अनेक ठिकाणी ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. परंतु त्या मागचा हेतू चांगला असतो. याउलट पाकिस्तानने मात्र व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणणारा निर्णय घेतला असून विशिष्ट ड्रेस कोडची सक्ती केली आहे.
शिक्षकांनी कोणते कपडे घालावेत आणि कोणते घालू नयेत असा आदेशच पाकिस्तान सरकारने काढल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. यापुर्वी महिलांच्या कपड्यांबाबत अनेकदा वादात सापडणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या राजवटीत आता महिला शिक्षकांना शाळांमध्येही घट्ट कपडे न घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाकिस्तानच्या फेडरल डायरेक्टरेट ऑफ एज्युकेशन संस्थेने महिला शिक्षकांना जीन्स आणि घट्ट कपडे घालायला बंदी करणारी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. तसेच पुरुष शिक्षकांना जीन्स आणि टी-शर्ट घालण्यापासून रोखण्याची सक्ती करण्यात आली आहे. शिक्षण संचालकांनी सोमवारी या संदर्भात शाळा आणि महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पत्र पाठवले आहे.
सदर पत्रात, याबाबत मुख्याध्यापकांना आदेश दिले आहे की, स्टाफचा प्रत्येक सदस्य साधे आणि चांगले कपडे घालून येईल. याशिवाय स्वच्छतेबाबत चांगल्या उपायांचे पालन करण्यास सांगितले आहे. यामध्ये नियमित केस कापणे, दाढी करणे किंवा दाढीला आकार देणे, नखे कापणे, आंघोळ करणे आणि दुर्गंधीनाशक किंवा अत्तर वापरणे यासारख्या चांगल्या उपायांचे वर्णन करणे समाविष्ट आहे.
अशा उपाययोजना पाकिस्तानमधील शिक्षकांनी कार्यालयीन वेळेत, तसेच कॅम्पसमध्ये आणि अधिकृत बैठका आणि अन्य कामादरम्यान केल्या पाहिजेत. या पत्रात अशीही शिफारस करण्यात आली आहे की, सर्व अध्यापन कर्मचारी वर्गामध्ये शिकवणी गाउन आणि प्रयोगशाळांमध्ये लॅब कोट घालावेत. याव्यतिरिक्त, गेट कीपर आणि शाळा आणि महाविद्यालयांच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी गणवेश सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.
या पत्रानुसार, महिला शिक्षकांना जीन्स किंवा पँट घालण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्यांना साधे आणि सभ्य सलवार कमीज, पायघोळ, दुपट्टा किंवा शाल असलेला शर्ट घालायला सांगितले आहे. बुरखा घातलेल्या स्त्रियांना त्यांचे स्वच्छ दिसणे सुनिश्चित करताना स्कार्फ किंवा हिजाब घालण्याची परवानगी असेल. हिवाळ्याच्या हंगामात, महिला शिक्षिका सभ्य रंग आणि डिझाईन्सचे कोट, ब्लेझर, स्वेटर, जर्सी, कार्डिगन आणि शाल घालू शकतात.
आता ब्रिटनमध्येही ड्रेस कोड?
प्रत्येक देशाच्या संसदेचे काही नियम असतात आणि कधीकधी हे नियम प्रत्येकाच्या सहमतीने बदलत राहतात. आपल्या देशातील, खासदारांसाठी ड्रेस कोड ब्रिटिश संसदेने लागू केला आहे. त्यामुळे खासदार यापुढे जीन्स, स्पोर्ट्स वेअर, टी-शर्ट किंवा स्लीव्हलेस टॉप घालून संसदेत येऊ शकणार नाहीत. एवढेच नाही तर स्पीकरने एक इशारा पत्र जारी केले आहे, ज्यामध्ये सर्व खासदारांना योग्य संसदीय पोशाखात सभागृहात येण्यास सांगितले आहे.
ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्समधील सुट्ट्या संपल्यानंतर सोमवारपासून संसदीय कामकाज पुन्हा सुरू झाले आहे. सभापती सर लिंडसे हॉयल यांनी खासदारांसाठी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये वर्तन आणि शिष्टाचाराचे नियम अद्ययावत केले आहेत. कोरोना नंतर, ब्रिटनमधील संसद यापुढे झूमवर चालणार नाही. लिंडसेने खासदारांना जीन्स किंवा स्पोर्ट पॅन्ट परिधान परिधान करण्यास प्रतिबंध केला आहे. तसेच त्यांनी नवीन ड्रेस कोड जारी केला आहे.