इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भाजप प्रवक्त्यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या कथित वक्तव्यावरून सुरू झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाही आहे. अनेक राज्यांमध्ये ‘जुमा की नमाज’च्या दिवशी हिंसक घटना समोर आल्या आहेत. अनेक देशांनीही याप्रकरणी निषेध नोंदवला आहे. त्यात अरब देशांचाही समावेश आहे. मात्र, प्रश्न असा उपस्थित होत आहे की, पाकिस्तानात शिया तर चीनमध्ये उइगर मुस्लिमांवर अनन्वित अत्याचार होत आहे. मात्र, याबाबत अरब देश गप्प आहेत. असे का होत आहे, हे जाणून घेणे आवश्यक आहे.
काही मुत्सद्दींचे म्हणणे आहे की, काही इस्लामिक देश या मुद्द्याला विनाकारण महत्त्व देत आहेत. ते काही सुनियोजित ‘चुकीच्या माहिती’चा भाग बनत असल्याचे दिसून येते. कोणाच्या तरी प्रभावाखाली हे प्रकरण आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही देश ‘प्रचार’चा भाग बनतात. चीनमध्ये विगार मुस्लिमांवर अत्याचार होतात, मग अरब देश बोलत नाहीत, पाकिस्तानमध्ये शिया मुस्लिमांना लक्ष्य केले जाते, तरीही हे देश गप्प राहतात.
विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय कार्याध्यक्ष आणि ज्येष्ठ अधिवक्ता आलोक कुमार म्हणाले की, आज जिहादी मुस्लिम नेतृत्व मुद्दाम मुस्लिम समुदायाला हिंसा आणि अधर्माच्या मार्गावर नेत आहे. अशा घटकांवर कडक कारवाई झाली पाहिजे. तसेच आलोक कुमार यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “आज मुस्लिमांमध्ये राहणारे काही जिहादी लोक संपूर्ण समाजाला हिंसाचाराच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच हे ना समाजाच्या हिताचे आहे ना देशाच्या हिताचे. जे घटक देशाची शांततापूर्ण आणि सर्वसमावेशक नैतिकता बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की भारत शरिया फौजदारी कायद्यानुसार नव्हे तर आपल्या घटनेनुसार कार्य करतो. ज्या लोकांचा वापर केला जात आहे त्यांनी लक्षात ठेवावे की ते या प्रकरणात न्यायाधीश होऊ शकत नाहीत.
माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान, गृहमंत्री आणि परराष्ट्र मंत्री, यांच्याकडून या गंभीर विषयावर विधान करणे अपेक्षित आहे. कारण या वातावरणात पंतप्रधानांच्या मौनाला काय अर्थ आहे. म्हणजे त्यांचे दुमत नाही, निदान इतके तरी म्हणता येईल. परराष्ट्र मंत्र्यांचे विधान अजून आलेले नाही. कारण त्यांनाही कुठूनतरी मंजुरी घ्यावी लागणार आहे.
अरब देश चीनमध्ये विगार मुस्लिमांवर होत असलेल्या कथित अत्याचाराबाबत मौन बाळगून आहेत हे खरे आहे. जेव्हा पाकिस्तानात शिया मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याच्या बातम्या येतात तेव्हा इस्लामिक राष्ट्रे मौन बाळगतात. पैगंबर वाद अचानक झाला नाही. ही एक क्रमिक मालिका होती. केंद्र सरकारने त्याला वेळीच रोखले नाही, कारण तो सरकारच्या धोरणाचा भाग असू शकतो. सरकारने मुत्सद्देगिरीने हे प्रकरण सोडवायला हवे होते.
स्वराज इंडियाचे माजी अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी म्हटले आहे की, आम्ही आंतरराष्ट्रीय मुस्लिम बांधवावर आशा ठेवू शकत नाही. संकटात सापडलेल्या भारतीय मुस्लिमांचे हितचिंतक या नात्याने, या आंतरराष्ट्रीय पाठिंब्याची दीर्घकालीन किंमत चुकवावी लागेल, याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. आज मोदी सरकारला त्यांच्या दोन प्रवक्त्यांमुळे जागतिक अपमानाला सामोरे जावे लागत आहे. जे देश पैगंबर वादावरून गदारोळ माजवत आहेत, त्यातील बहुतांश मुस्लिम देशांनी त्यांच्या अल्पसंख्याकांना योग्य वागणूक दिली नाही. त्या देशांमध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा दर्जा खराब आहे. असे असतानाही ते भारताची माफी मागण्याचे बोलत आहेत, त्यामुळे त्यांचा उद्धटपणा यातून दिसून येतो. चीनमधील विगार मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत पाकिस्तान किती वेळा बोलला, नगण्य. मात्र, पाकिस्तानला पैगंबर वादात उडी घ्यायला वेळ लागला नाही.
Pakistan Shia China Uyghur Muslim persecution Arab Countries violence protest silence