इस्लामाबाद – जनतेचे कल्याण करणे आणि तेथे कायद्याचे राज्य स्थापन करणे हे प्रत्येक देशातील शासनाचे त्याच्या प्रमुख कर्तव्य असते. त्यामुळेच देशाचा विकास होऊ शकतो. जनतेच्या पर्यायाने देशाच्या कल्याणासाठी शासन प्रमुख नेहमीच प्रयत्नशील असतो. परंतु एखाद्या देशातील शासन प्रमुखाने जर याबाबत हातबलता व्यक्त केली, तर तो देश निश्चितच कर्जबाजारी झाला किंवा विकासापासून दूर जात आहे, असे म्हणावे लागेल.
पाकिस्तानबाबत देखील असेच घडत आहे. या देशाचे प्रमुख असलेले पंतप्रधान इम्रान खान यांनी देखील अशीच हतबलता व्यक्त केली आहे. ठराविक व्यक्तीचा संसाधनांवर कब्जा असून बहुसंख्य जनता आरोग्य, शिक्षण आणि न्याय या सुविधांपासून वंचित आहे, असे इम्रान खान म्हणाले. तसेच देशात कायद्याचे राज्य नसणे ही पाकिस्तानच्या मागासलेपणाची प्रमुख कारणे आहेत. पाकिस्तानात हजारो दहशतवादी सक्रिय असल्याचे इम्रानने आधीच मान्य केले आहे.
अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील जेतुना कॉलेजचेही प्रमुख व मुस्लिम विद्वान शेख हमजा युसूफ यांच्या ऑनलाइन मुलाखतीत इम्रानने यांनी सांगितले की, पाकमध्ये कायद्याचे राज्य नसल्यामुळे देश ज्या उंचीवर पोहोचायला हवा होता तिथे पोहोचला नाही. देश नियमानुसार चालत नाही तोपर्यंत कोणताही समाज प्रगती करू शकत नाही, असेही ते म्हणाले. बहुतेक विकसनशील देशांमध्ये ही समस्या आहे. पाकिस्तानातही गरीबांसाठी वेगळा आणि श्रीमंतांसाठी वेगळा कायदा आहे.
त्यांनी आणखी सांगितले की, गुन्हा करणाऱ्याच्या गुणवत्तेच्या आधारावर कायदा काम करतो. जर तुम्ही श्रीमंत असाल तर तुम्ही मोठ्या पदावर बसाल आणि गरीब असाल तर आयुष्यभर संघर्ष करत राहाल. मदिना विषयी प्रेषित मुहम्मद यांनी कल्पिल्याप्रमाणे पाकिस्तानला एक कल्याणकारी इस्लामिक राष्ट्र बनवायचे आहे. त्यांच्या सरकारला दोन तत्त्वांचे पालन करून देशाला पुढे न्यायचे आहे. यापैकी एक तत्त्व म्हणजे पाकिस्तानला कल्याणकारी राज्य बनवणे आणि दुसरे म्हणजे कायद्याचे राज्य प्रस्थापित करणे.
पर्यावरणाच्या मुद्द्यावर इम्रान म्हणाले, कायद्यात सुधारणा करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत. कारण पृथ्वीवरील जीव वाचवण्यासाठी ते आवश्यक आहे. या कामात प्रामाणिकपणा नसल्यास भविष्यात संकटे येतील आणि नंतर कोणीही काही करू शकणार नाही. वर्तमानात माणूस जे काही करतो ते येणाऱ्या पिढ्यांना वाटून घेतले जाईल. बहुतांश मुस्लिम देशांच्या राज्यकर्त्यांवरचा जनतेचा विश्वास उडाला आहे. तडजोडी करून सत्तेत येतात आणि मग त्यात राहून आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी काम करण्यासाठी तडजोडी करतात. हे सार्थी हितत्यांना जनतेच्या हितापासून दूर करते.