इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. पाक रेंजर्सनी ही अटक केल्याचे सांगण्यात आले आहे. पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे अध्यक्ष इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाबाहेर अटक करण्यात आली आहे. अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात हजर राहण्यासाठी इम्रान जेव्हा उच्च न्यायालयात पोहोचले तेव्हा त्यांना पाक रेंजर्सनी ताब्यात घेतले.
या प्रकरणानंतर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आमेर फारूक यांनी गृह मंत्रालयाचे सचिव आणि इस्लामाबादचे पोलीस प्रमुख यांना बोलावले. त्यांनी सर्वांना १५ मिनिटांत न्यायालयात हजर राहण्यास सांगितले. न्यायमूर्ती फारुख म्हणाले की, पोलीस प्रमुख न्यायालयात हजर झाले नाहीत तर आम्ही पाकिस्तानच्या पंतप्रधानांना येथे बोलावू. तुम्हीच सांगा इम्रानला कोणत्या प्रकरणात आणि का अटक करण्यात आली?
पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे वकील फैसल चौधरी यांनी याला दुजोरा दिला आहे. दुसरीकडे, पीटीआय नेते मुसरत चीमा यांनी एका व्हिडिओ संदेशात म्हटले आहे की ते इम्रान खानला मारत आहेत. त्यांनी इम्रान खानसोबत काहीतरी केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इम्रान खान यांना अटक केल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. न्यायालयाबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. इम्रान खान यांचे वकील आणि समर्थकांनाही मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
अटकेपूर्वी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान म्हणाले की, माझ्यावर कोणताही गुन्हा नाही. त्यांना मला तुरुंगात टाकायचे आहे, मी त्यासाठी तयार आहे. यानंतर इम्रान यांना अटक झाल्याची बातमी आली. या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) ने ट्विट केले आहे की पाकिस्तान रेंजर्सने पीटीआय अध्यक्ष इम्रान खान यांना अटक केली आहे. तसेच, धक्काबुक्की करीत त्यांना गाडीत बसविले
https://twitter.com/spectatorindex/status/1655871962315649025?s=20
Pakistan PM Imran Khan Arrested Video Viral