इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पाकिस्तानात पेट्रोलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. इथे पेट्रोलचा दर २७२ रुपये ९५ पैसे प्रतिलिटर झाला आहे. १ ऑगस्टपासून पेट्रोलच्या दरात १९ रुपये ९५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. डिझेलचा दरात ही वाढ १९ रुपये ९५ रुपये केल्यामुळे आता डिझेलचे दर २७३.४० रुपये प्रतिलिटर झाले आहे.
याअगोदरही पेट्रोल व डिझेलच्या दरात ब-याच वेळा वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे येथे हाहाकार उडाला आहे. पाकिस्तानातील आर्थिक परिस्थिती श्रीलंकेसारखी होत चालल्याचं म्हटले जात आहे. श्रीलंकेतील आर्थिक परिस्थिती सध्या बिकट आहे. श्रीलंकेतील आर्थिक संकट सुरु झाले तेव्हाही सुरुवातीला इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली होती. आता पाकिस्तानमध्ये इंधनाचे दर वाढल्यामुळे जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. पाकिस्तानातील आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खालावत असून त्यामुळे हे इंधनाचे दर वाढले आहे.
pakistan petrol price today fuel