लाहोर – मानवतेच्या विरोधात कारनामे करणारा देश स्वतः कधीच आनंदी राहू शकत नाही. पाकिस्तानची सध्या तशीच परिस्थिती आहे. एकीकडे गरिबी, महागाई, दुसरीकडे कोरोनाचे वाढते रुग्ण आणि अपुरी लसअशी त्यांची परिस्थिती आहे. अश्यात पाकिस्तानातील नापाक लोक एकमेकांनाच खायला निघाले आहेत. पाकिस्तानच्या संसदेत असेच चित्र बघायला मिळाले.
प्रत्येकच देशाच्या संसदेत गोंधळ होत असतो. वादावादी होते. शाब्दिक चकमक उडते. मात्र मारपीट, शिविगाळ करण्याचा ‘आदर्श‘ फक्त पाकिस्तानच्याच संसदेने घालून दिला आहे. सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील खासदारांनी एकमेकांना शिवीगाळ करताना प्रशासकीय अर्थसंकल्पाचे महत्त्वाचे दस्तावेज एकमेकांवर फेकले.
यात एक महिला सदस्य जखमीही झाली. नॅशनल असेंबलीमध्ये अर्थमंत्री शौकल तारिन यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यावर चर्चा होणार होती. विरोधी पक्षनेता शाहबाज शरीफ यांनी अर्थसंकल्पावर चर्चा सुरू होण्यापूर्वी भाषण द्यायला सुरुवात केली तर सत्तापक्षाने गोंधळ घातला. बघता बघता संसदेला एखाद्या युद्धाच्या मैदानासारखे स्वरुप आले. काही खासदार वेलमध्ये आले आणि एकमेकांच्या तोंडावर शिविगाळ करू लागले. अखेर अर्थसंकल्पाची कागदे फेकली.
व्हिडीओ व्हायरल
विरोधी पक्षावर ओरडतानाचा सत्तारुढ पक्षाचे नेते अली अवान यांचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. त्यातच अर्थसंकल्पाच्या कागदांचा एक बंच डोळ्याला लागल्यामुळे खासदार मलिका बुखारी जखमी झाल्याचेही त्यात दिसले. त्यामुळे केवळ पाकिस्तानने नव्हे तर संपूर्ण जगाने हा गोंधळ बघितला.
बघा हे दोन व्हिडिओ
https://twitter.com/hyzaidi/status/1404834959681069063
https://twitter.com/MoeedNj/status/1404923452339982341