नवी दिल्ली – जगातील अनेक देशांमध्ये विचित्र कायदे आहेत. हे कायदे पाहून नागरिक चांगलेच हैराण होतात. आपल्या शेजारी असलेल्या पाकिस्तानमध्येसुद्धा असेच काही विचित्र कायदे आहेत. अशा कायद्यांमध्ये पाकिस्तान पहिल्या स्थानावर आहे. अशा कायद्यांमुळे पाकिस्तानवर जगभरात टीकाही केली जाते. काही महिन्यांपूर्वी एका कायद्यामुळे पाकिस्तानवर चांगलीच टीका करण्यात आली होती.
पाकिस्तानच्या सिंध प्रांतात एका विचित्र विधेयकाचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. पाकिस्तानसह जगभरात हे विधेयक चर्चेचा विषय ठरले होते. १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर लग्न करणे अनिवार्य करावे असा प्रस्ताव या विधेयकात ठेवण्यात आला होता. का कायदा मान्य न करणार्यांना शिक्षेची तरतूदही करण्यात आली होती. समाजातील वाईटपणा दूर व्हावा तसेच बलात्कार रोखण्यास मदत मिळावी, असा पाकिस्तानमधील राजकारण्यांचा तर्क होता. या विचित्र कायद्याबद्दल आणखी माहिती घेऊयात
विनापरवानगी फोनला स्पर्श
पाकिस्तानमध्ये विनापरवानगी फोनला स्पर्श करणे बेकायदेशीर मानले जाते. जर कोणी दुसर्या व्यक्तीच्या फोनला परवानगी न घेता स्पर्श करेल तर त्याला शिक्षा भोगावी लागते. अशा व्यक्तीला ६ महिन्यांचा कारावास होऊ शकतो.
इंग्रजी अनुवाद
पाकिस्तानात तुम्ही काही शब्दांचा इंग्रजी अनुवाद करू शकत नाही. अल्लाह, मशीद, रसूल किंवा नबी या शब्दांचे इंग्रजीत भाषांतर करणे बेकायदेशीर मानले जाते. याचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाई केली जाते.
शिक्षण शुल्क
पाकिस्तानात शिक्षणावर कर द्यावा लागतो. जर कोणताही विद्यार्थी शिक्षणावर २ लाखांहून अधिक खर्च करतो तर त्याला ५ टक्के कर भरावा लागतो. याच भीतीमुळे कदाचित पाकिस्तानात नागरिक कमी शिक्षण घेतात.
मुलीसोबत राहिल्यास
कोणताही मुलगा गर्लफ्रेंडसोबत राहात असताना पकडला गेला तर त्याला कारागृहात शिक्षा भोगावी लागते. पाकिस्तानात कोणीही मुलीसोबत मैत्री करू शकत नाही. लग्नापूर्वी मुलगा आणि मुलगी एकत्र राहू शकत नाही हा तेथील कायदा आहे.
या ठिकाणी जाण्यावर बंदी
पाकिस्तानात कोणताही नागरिक इस्रायलला जाऊ शकत नाही. तिथे जाण्यास कोणालाही परवानगी नाही. पाकिस्तान सरकारकडून इस्रायलला जाण्यासाठी व्हिसा दिला जात नाही.