इस्लामाबाद – जगभरात वादग्रस्त व बदनाम असलेली पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘आयएसआय’च्या नवीन संचालकाच्या नियुक्तीवरून पंतप्रधान इम्रान खान आणि लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्यात मतभेद आहेत. कारण लष्करप्रमुखांनी पंतप्रधानांना तीन नावे प्रस्तावित केली होती. पण पंतप्रधानांना ती नावे पसंत नाहीत तर दुसरीकडे बाजवा इम्रान खानचे ऐकायला तयार नाहीत. सत्तारूढ पक्ष तेहरीक-ए-इन्साफने नॅशनल असेंब्लीमध्ये लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्याशी पंतप्रधानांच्या भेटीचा तपशील उघड केल्याबद्दल खळबळ उडाली होती. बाजवा इम्रान खानचे ऐकायला तयार नाहीत? त्यामुळे अद्याप आयएसआयचा नवीन प्रमुख निश्चित झालेला नाही.
तत्पूर्वी, कॅबिनेट मंत्री याबाबत माहिती देताना फवाद चौधरी म्हणाले की, पंतप्रधान इम्रान खान यांना घटनेनुसार आयएसआयच्या संचालकाची नियुक्ती हवी आहे. परंतु संरक्षण विषयाच्या तज्ज्ञांच्या मते, नियुक्तीच्या प्रक्रियेचा उल्लेख संविधान किंवा लष्कर कायद्यात नाही. या अंतर्गत लष्करप्रमुखांनी पंतप्रधानांना तीन नावे प्रस्तावित केली होती. याबाबत अंतिम निर्णय फक्त पंतप्रधान घेतात.
नियुक्तीसंदर्भात पंतप्रधान कार्यालयाकडून कोणतीही अधिसूचना जारी करण्यात आली नसल्याने सरकारला मौन तोडणे भाग पडले. मात्र फवाद चौधरी यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, पंतप्रधानांना आयएसआयचे संचालक नेमण्याचा अधिकार आहे. त्यामुळे पीएम ऑफिस किंवा लष्करी यंत्रणा एकमेकांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारे असे कोणतेही पाऊल उचलणार नाही.