नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाकिस्तान मध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडी घडत आहेत. पंतप्रधान इम्रान खान यांचे सरकार कोसळून आता तेथे पंतप्रधान शहबाज यांचे नवीन सरकार स्थापन झाले आहे. परंतु पाकिस्तानमध्ये कोणतेही सरकार आले तरी या पाकच्या भारतविरोधी गुप्त कारवाया करण्याचे धोरण मात्र कायम असते. अशा प्रकारच्या कारवायांमध्ये दहशतवादी संघटनांचा मोठा हात असतो. त्यातच आता सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय लष्करातील गुप्त माहिती पाकिस्तानच्या काही दहशतवादी संघटनांकडून काढून घेतली जात असल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे भारतीय लष्करात मोठी खळबळ उडाली आहे.
हेरगिरीचा प्रयत्न करताना पाकिस्तानने काही भारतीय लष्करी अधिकाऱ्यांना लक्ष्य केल्याची माहिती भारतातील लष्कर आणि इतर गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. पाक हेरगिरीशी संबंधित सायबर सुरक्षा उल्लंघनाची माहिती मिळाल्यानंतर काही भारतीय लष्करी अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे.
उत्तर पश्चिम भारतातील लष्कराच्या फॉर्मेशनमध्ये पोस्ट केलेले काही अधिकारी हे व्हॉट्सअॅप ग्रुप्समध्ये सहभागी होते, यामध्ये काही माजी सैनिक आणि नागरिकही जोडलेले होते. या व्हॉट्सअॅप ग्रुप्सशी संबंधित नागरिकांपैकी एक पाकिस्तानी गुप्तचर अधिकारी असल्याचा संशय आहे, असे सूत्राने सांगितले.
एका अधिकृत वृत्तानुसार, लष्कराच्या काही विभागाची चौकशी सुरू आहे. या घटनेदरम्यान कोणतीही गोपनीय माहिती लीक झाली होती किंवा संबंधित अधिकार्यांनी काहीतरी संशयास्पद शेअर केले होते. ते संबंधित कार्यरत अधिकारी अशा व्हॉट्सअॅप ग्रुप्सचा भाग असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, नियमांनुसार हे लष्कराच्या सायबर सुरक्षा धोरणाचे उल्लंघन आहे.
विशेष म्हणजे विद्यमान आदेशांचे उल्लंघन करणे शक्य तितक्या कठोर पद्धतीने हाताळले जाते, कारण ते अधिकृत गुप्त कायद्याच्या अधीन आहेत. तपासात दोषी आढळलेल्या सर्व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही सूत्रांनी सांगितले.