इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती चिंतेचा विषय बनली आहे. आर्थिक परिस्थिती डबघाईस केली असून नागरिकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. इतर देशांची मदत घेऊन सरकारला कारभार चालवावा लागत आहे. अशात आता पाकिस्तानवर गाढव विकण्याची वेळ आल्याची माहिती पुढे आली आहे.
आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था गाढव सांभाळतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कंगाल पाकिस्तानवर आता गाढव विकण्याची वेळ आली आहे. चीन पाकिस्तानकडून ही गाढवं खरेदी करणार आहे. पाकिस्तानच्या गाढवांचे देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे योगदान आहे. चीनमध्ये गाढवांची प्रचंड मागणी आहे. त्याशिवाय पाकिस्तानच्या गाढवांमध्ये चीनने कायमच स्वारस्य दाखवले आहे. या पार्श्वभूमीवर आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी आता पाकिस्तान चीनला गाढव निर्यात करणार आहे.
चीनमध्ये गाढवाच्या कातडीला खूप मागणी आहे, त्यामुळे गाढवाची मागणी जास्त आहे. चीनमध्ये गाढवांची संख्या कमी असल्याने चीनला पाकिस्तान, आफ्रिकेसारख्या इतर भागातून गाढवं आयात करावी लागतात. सध्या पाकिस्तान कंगाल झाला असून देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहे. अशात चीनची मागणी पाकिस्तानसाठी आधार ठरु शकते. यामुळे पाकिस्तानने चीनला गाढवं आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तान सरकारने गाढवाचे कातडे तसेच इतर काही वस्तू चीनला निर्यात करण्यास मान्यता दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गाढवाची कातडी चीनला प्रक्रियेसाठी पाठवली जाणार आहे. चीनमध्ये गाढवाच्या कातडीला खूप मागणी आहे. त्यामुळे तेथे गाढवांना नेहमीच मागणी असते. चीनमध्ये गाढवांच्या कातडीपासून विविध वस्तू तयार केल्या जातात.
म्हणून चीनमध्ये मागणी
चीनमध्ये गाढवांची प्रचंड मागणी आहे. अशक्तपणा, प्रजनन समस्या आणि निद्रानाश यांच्या उपचारांसह अनेक कथित औषधी फायद्यांसाठी चीनमध्ये गाढवाच्या त्वचेचा वापर केला जातो. चीनमध्ये गाढवाच्या त्वचेपासून सौंदर्य उत्पादनेही तयार केली जातात. पूर्वी ही औषधे फक्त चीनचे राजेशाही लोक वापरत होते. पण आता चीनच्या मध्यमवर्गीयांमध्ये त्याची मागणी खूप वाढली आहे. परिणामात: तिथे गाढवांची आयात करावी लागत आहे.