इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पाकिस्तानमध्ये हिंदूंवरील अत्याचाराचे प्रकरण पुन्हा एकदा समोर आले आहे. यावेळी हैदराबाद शहरात एक संतापजनक घटना घडली. एका हिंदू अल्पवयीन मुलीचे सर्वप्रथम अपहरण करण्यात आले. त्यानंतर तिचे धर्मांतर करून लग्न करण्यात आले. शिवाय तिच्यावर अनेक दिवस अत्याचार करण्यात आले. गुन्ह्याच्या एका महिन्यानंतर पोलिसांनी तिला परत मिळवले, तेव्हा न्यायाधीशांनी एका विचित्र निकालाने हिंदू मुलीला धक्का दिला. न्यायाधीशांसमोर आईला चिकटून ती रडू लागली. अखेर तो हृदयद्रावक प्रसंग पाहून न्यायाधीशांनी आपला निर्णय बदलला. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण…
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, ऑगस्ट महिन्यात एका हिंदू अल्पवयीन मुलीचे (वय १५) मुस्लिम तरुणाने अपहरण केले होते. मुलीच्या पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली मात्र, पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. अखेर महिन्याभराने गुन्हा दाखल करण्यात आला. कुठल्यातरी माहितीच्या आधारे पोलीस आणि मानवाधिकार कायदा पथकाने मुलीला बलुचिस्तानमधून ताब्यात घेतले आणि हैदराबादला परत आणले. त्यानंतर कराचीच्या न्यायालयाने या प्रकरणावर सुनावणी करत आरोपी मुलाच्या बाजूने निकाल दिला.
वास्तविक, दोघांनीही स्वेच्छेने लग्न केल्याची तक्रार आरोपीने मुलीच्या कुटुंबीयांकडे केली होती. यावेळी त्याने मुलीच्या वयाचे प्रमाणपत्रही न्यायालयात दाखवले. त्यावर न्यायाधीशांनी मुलीला आरोपी मुस्लिम तरुणासोबत पाठवण्याचा निर्णय दिला. हा निकाल ऐकून मुलगी रडू लागली. आईला बिलगून मुलीने जोरदार हंबरडा फोडला. हे पाहून न्यायाधीशांचे मन हेलावले. अखेर त्यांनी मुलीला तिच्या घरी पाठवण्याचे आदेश दिले जेणेकरून ती तिच्या कुटुंबीयांना भेटू शकेल. मुलीच्या कुटुंबीयांनी न्यायाधीशांना सांगितले की, आरोपींनी तिचे अपहरण केले आणि त्यातील एकाने तिच्याशी जबरदस्तीने लग्न केले. लग्नापूर्वी त्यांच्या मुलीचा धर्म बदलण्यात आला होता. आरोपी आणि पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. तोपर्यंत आरोपी हा मुलीला किंवा तिच्या कुटुंबीयांना भेटणार नाही, असा आदेश न्यायाधीशांनी दिला.
Pakistan Court Minor Girl Kidnap Religious transformation
Legal Judge Hindu