लाहोर – पाकिस्तानमध्ये पंजाब प्रांतातील रहिमयार खान जिल्हयातील भोंग येथील हिंदू मंदिरावर हल्ला करण्यात आला आहे. तर काही मंदिरांना आग लावण्यात आली आहे. त्यामुळे तेथील परिस्थिती अतिशय तणावपूर्ण आहे, अशी माहिती नॅशनल असेंब्लीचे सदस्य आणि पाकिस्तान हिंदू परिषदेचे प्रमुख डॉ. रमेश वंकवानी यांनी दिली आहे. तसे ट्विट त्यांनी केले आहे. मंदिराच्या तोडफोडीचे व्हिडिओही त्यांनी पोस्ट केले आहेत. स्थानिक पोलिसांचा निष्काळजीपणा हा अत्यंत लाजिरवाणा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याप्रकरणाची दखल घेऊन सरन्यायाधीशांना कारवाई करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.
https://twitter.com/RVankwani/status/1422938438966423555?s=20
https://twitter.com/RVankwani/status/1422968046566756352?s=20