काबूल – सुरक्षेच्या कारणामुळे पाकिस्तानी संसदीय प्रतिनिधींना अफगाणिस्तानमध्ये उतरण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. पाकचे विमान काबूलमध्ये उतरणार होते, स्फोटाच्या धमक्यामुळे ती ट्रिप रद्द करण्यात आली, असे सांगण्यात असले तरी यातून अफगाणिस्तानने पाकिस्तानला चांगला धडा शिकवला आहे.
पाकिस्तानचे विशेष राजदूत मोहम्मद सादिक यांनी एका ट्वीटमध्ये लिहिले आहे की, सुरक्षा स्फोटांमुळे विमानतळ बंद करण्यात आल्याने स्पीकरची काबूलची भेट पुढे ढकलण्यात आली होती. विमानतळ बंद होताना हे कळल्याने विमान खाली उतरणार होते, परंतु ते परत आणण्यात आले. परस्पर सल्लामसलत नंतर प्रवासाच्या नवीन तारखा ठरविल्या जातील.
वास्तविक, संसदीय सचिव असद कैसर यांच्या नेतृत्वात पाच सदस्यीय संसदीय प्रतिनिधी तीन दिवसांच्या भेटीसाठी अफगाणिस्तानाला जाणार होते. यावेळी दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी चर्चा होणार होती. तथापि, पाकिस्तानचे माजी सिनेट सदस्य फरहतुल्ला बाबर यांनी ऐनवेळी दौरा रद्द करण्यावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
दरम्यान, एफएटीएफने पाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्याचा धोका म्हणून या दौरा रद्द प्रकरणाकडे पाहिले जात आहे. तसेच कॅनडाचे माजी राजदूत ख्रिस अलेक्झांडर यांनी इस्लामाबादला फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सने काळ्या सूचीत आणावे, असे म्हटले आहे.
इम्रान खान सरकार तालिबान व इतर दहशतवादी संघटनांना पाठिंबा देत आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पाकिस्तानात ज्येष्ठ तालिबान नेत्यांनी त्यांचे अनुयायी आणि तालिबानी लढाऊ सैनिकांना भेटल्याच्या व्हिडिओंची मालिका समोर आली होती.