फैसलाबाद (पाकिस्तान) – पंजाब प्रांतात फैसलाबादमध्ये एक लज्जास्पद प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल झाला असून जगभरातून या प्रकाराचा निषेध होत आहे. एका दुकानातून चोरी केल्याच्या आरोपावरून किशोरवयीन मुलासह ४ महिलांना विवस्त्र करण्यात आले. एवढ्यावरच हे थांबले नाही तर या महिलांसह मुलाची विवस्त्र अवस्थेतच धिंड काढण्यात आली.
लाहोरपासून १८० किमी अंतरावर ही घटना घडली. सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये एका किशोरवयीन मुलासह चार महिला आपल्या आजूबाजूच्या नागरिकांना त्यांचे शरीर झाकण्यासाठी विनंती करताना दिसल्या, परंतु त्यांना लाठ्यांने मारहाण करण्यात येत होती. तसेच या स्त्रिया रडताना दिसल्या आणि मारहाण करणाऱ्यांना त्या आम्हाला घरी जाऊ द्या अशी विनंती करताना दिसल्या पण काही उपयोग झाला नाही. या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पंजाब पोलिसांनी कारवाई केली.
पंजाब पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही या दुर्दैवी घटनेसंदर्भात पाच जणांना अटक केली आहे. कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार पाच संशयित आणि इतर अनेकांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणातील पीडित महिलांनी तक्रारीत म्हटले आहे की, आम्ही फैसलाबाद येथील बावा चक मार्केटमध्ये कचरा वेचण्यासाठी गेले होते. आम्हाला तहान लागली म्हणून आम्ही स्टोअरमध्ये जाऊन पाण्याची बाटली मागितली. मात्र त्याचा मालक सद्दाम याने आमच्यावर चोरीच्या उद्देशाने दुकानात प्रवेश केल्याचा आरोप केला.
बघा या घटनेचा व्हायरल व्हिडिओ
https://twitter.com/maheshmvasu/status/1468223706853826563?s=20
तसेच सद्दाम व इतरांनी आम्हाला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने तिला ओढून नग्न केले आणि मारहाण केली. कपडे उतरवल्यानंतर त्यांनी आमचा व्हिडिओही बनवला. मात्र हा अत्याचार थांबवण्यासाठी जमावातील कोणीही नागरिकांनी या गुन्हेगारांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही.