इस्लामाबाद : भारतीय संस्कृतीत सर्व धर्माच्या प्रार्थनास्थळांचा आदर करण्यात येतो, परंतु आपल्या शेजारी देशात म्हणजेच पाकिस्तानमध्ये मात्र तेथील अल्पसंख्यांक समाजाच्या प्रार्थनास्थळांवर वारंवार हल्ले करण्याच्या घटना घडतात. कधी हिंदू धर्माच्या मंदिरांवर तर कधी शिख समाजाच्या गुरूद्वारावर येथे हल्ले होतात. काल ३० ऑगस्ट रोजी कृष्ण जन्माष्टमी निमित्त येथील श्रीकृष्ण मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. परंतु त्याच वेळी काही दहशतवादी लोकांनी या मंदिरावर हल्ला करून श्रीकृष्णाच्या मूर्तीची विटंबना केली या घटनेचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे. विशेष म्हणजे महिनाभरापूर्वी देखील पाकिस्तानमध्ये अशीच घटना घडली होती.
सोमवारी पाकमधील अल्पसंख्यांक हिंदू समाजाच्यावतीने श्रीकृष्णाची जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असताना सिंध प्रांतामधील संगार जिल्ह्यात एका माथेफिरु जमावाने या भागातील मंदिराची तोडफोड केली आणि श्रीकृष्णाच्या मूर्तीची विटंबना केली. पाकिस्तानच्या राष्ट्रीय संसदेचे सदस्य, ह्युमन राईटचे पार्लमेंट सेक्रेटरी लाल मल्ही यांनी दहशतवाद्याकडून मंदिराची तोडफोड आणि श्रीकृष्णाची मूर्ती विटंबना झाल्याच्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. तसेच अन्य धर्मियांची मंदिरे आणि देवतांवर वारंवार होणारे हल्ले रोखण्यासाठी कायदा करुन त्याची त्वरीत अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर टाकलेल्या काही छायाचित्रे आणि प्रतिमांमध्ये ‘ श्रीकृष्णाच्या मूर्तीचे विटंबना झाले असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे, या महिन्याच्या सुरुवातीला, पंजाब प्रांतातील रहीमयार खान जिल्ह्यातील भोंग शहरात एका हिंदू मंदिराची तोडफोड केल्याप्रकरणी अनेक जणांना अटक करण्यात आली होती. ४ ऑगस्ट रोजी एका दहशतवादी जमावाने भोंगमधील एका श्रीगणेश मंदिराची तोडफोड करून देवतांच्या मूर्तींची विटंबना केली होती. आता पुन्हा अशी घटना घडल्याने याचा सर्वत्र निषेध व्यक्त असून हिंदू धर्मियांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
https://twitter.com/LALMALHI/status/1432376787003183104?s=20