इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – असे म्हणतात की, राजकारणातील व्यक्तींना खासगी आयुष्य नसते. तसेच खासगी आयुष्य असल्यास त्यामध्ये अनेक प्रकारचे वाद आणि कलह निर्माण होत असतात, जगभरातील अनेक राजकारणी आणि नेते त्यांच्या बाबत असे प्रकार घडलेले दिसून येतात. पाकिस्तान मध्ये देखील सध्या असाच प्रकार सुरू आहे, असे म्हटले जाते. पाकिस्तानमध्ये आर्थिक, राजकीय आणि संरक्षणविषयक संकटाला तोंड देत असतानाच आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना आता घरातील वादाने घेरले आहे. देशाच्या राजकारणात रमलेले किंबहुना कामाच्या रगाडयात गढून गेलेल्या इम्रान खान आणि त्यांची तिसरी पत्नी यांच्यात सध्या काही ठीक चाललेले नाही. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, इम्रान खान आणि त्यांची तिसरी पत्नी बुशरा बीबी मनेका यांच्यात भांडण झाले आहे. तसेच हे प्रकरण इतके गंभीर झाले आहे की, बुशरा बीबी इस्लामाबादमध्ये इम्रान खान यांच्या घरी असलेला उत्सव सोडून लाहोरला गेल्या आहेत. तेथे त्यांची मैत्रिण सानिया शाह सोबत राहत आहेत. दुसरीकडे इम्रान खानने पत्नीला सोडल्यानंतर घरातील सर्व कर्मचारी बदलले आहेत. इम्रान खानने घरातील माळी, स्वयंपाकी आणि ड्रायव्हरही बदलले आहेत.
इमरान खानचे पहिले लग्न जेमिमा गोल्डस्मिथसोबत झाले होते. दोघांनी 1995 मध्ये लग्न केले. यानंतर 2004 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. जेमिमापासून घटस्फोट घेतल्यानंतर 11 वर्षांनी इम्रान खानने त्यानंतर बीबीसीची माजी टीव्ही अँकर असलेल्या रेहम खानसोबत दुसरे लग्न केले. मात्र रेहम खानसोबतचे नाते फार काळ टिकले नाही. अवघ्या 8 महिन्यांत दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर इम्रान खानसोबत बुशरा मनेकाचे नाव जोडले गेले. इम्रान खानने सुरुवातीला मानेकसोबतच्या अफेअरचा इन्कार केला असला तरी 2018 मध्ये त्याने बुशरासोबत लग्न केल्याचे मान्य केले होते. सुमारे 44 वर्षांची बुशरा खान ही इम्रान खान 25 वर्षांनी लहान आहे. इम्रान खानची तिसरी पत्नी घर सोडून गेल्याच्या वृत्ताला सोशल मीडियावरील अनेक ज्येष्ठ पाकिस्तानी पत्रकारांनीही दुजोरा दिला आहे. तसेच याबाबत नागरिकांमध्ये दबक्या आवाजात उलटसुलट चर्चा सुरू आहे.