इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पहलगाम येथील हल्ल्यात हिंदू पर्यटकांसोबत दहशतवाद्यांनी मुस्लिम तरुणालाही गोळ्या घातल्या आहे. पहलगाममधल्या बैसरन इथं अतिरेकी पोहोचले.
पर्यटकांना धर्म विचारु लागले तेव्हा येथील स्थानिक घोडेस्वार सैय्यद हुसैन शाह याने विरोध केला. घोडेस्वारीसाठी तो पर्यटकांना तिथं घेऊन आला होता.
त्याने दहशवाद्यांना सांगितले की, हे सर्वजण निष्पाप आहेत. काश्मीरचे पाहुणे आहेत. कोणावरही गोळी झाडू नका अशी विनंती त्याने केली. अतिरेक्यांनी त्याचं ऐकलं नाही.
त्यानंतर घोडेस्वाराने एका अतिरेक्याच्या हातातली AK 47 रायफल हिसकावून घेतली. तोवर दुसऱ्याने त्याच्यावर हल्ला केला. धरपकड झाली आणि या घोडेस्वाराला गोळी लागली. रक्तबंबाळ झालेल्या या घोडेस्वाराला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण तोवर या घोडेस्वाराचा मृत्यू झाला होता. या घोडेस्वाराच्या विरोधामुळे अनेकांचे प्राण वाचले, असे पर्यटकांनी सांगितले.
या घोडेस्वाराचे नाव सैय्यद हुसैन शाह आहे. घरात कमावणारा एकुलता एक पोरगा. तो अतिरेक्यांशी लढता लढता मृत्यूमुखी पडला.