शुक्रवार, डिसेंबर 5, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

कोण आहेत पद्मश्री मंजम्मा जोगती? असा आहे त्यांचा अत्यंत संघर्षमय प्रवास

नोव्हेंबर 10, 2021 | 11:18 am
in संमिश्र वार्ता
0
dancer manjamma

मनिष कुलकर्णी, नवी दिल्ली

लिंगपरिवर्तन (ट्रांसजेंडर) करणार्या नृत्यांगना मंजम्मा जोगती यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वीकारताना मंजम्मा यांनी राष्ट्रपती कोविंद यांना अनोख्या अंदाजात अभिवादन केले. ते पाहून संपूर्ण दरबार सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. यावर्षीच्या पद्म पुरस्कारांच्या यादीत सात पद्मविभूषण, दहा पद्मभूषण आणि १०२ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश होता. त्यामध्ये २९ महिला पुरस्कार विजेत्या, १६ मृत्यूपश्चात पुरस्कार विजेते आणि मंजम्मा या एकमेव ट्रांसजेंडर पुरस्कार विजेत्या होत्या. मंजम्मा यांचे आयुष्य खूपच संघर्षमय आणि कठीण ठरले आहे. परंतु त्या डगमगल्या नाहीत. त्या लढत राहिल्या. चला तर जाणून घेऊयात मंजम्मा यांच्या संघर्षमयी जीवनाची कहाणी.

कर्नाटकात जन्म
कर्नाटकातील बेल्लारी जिल्ह्यातील कल्लुकंब गावात ५० च्या दशकात मंजूनाथ शेट्टी (मंजम्मा जोगती) यांचा जन्म झाला. मंजूनाथ शाळेत जाऊ लागल्या तेव्हा त्यांचे हावभाव, राहणीमान मुलींसारखे होते. त्यांना मुलींसोबत राहणे पसंत होते. त्यांना मुलींसोबत नृत्य करायला तसेच खेळायलाही आवडत असे.

मंजूनाथ असे झाले मंजम्मा जोगती
मंजूनाथ मंजम्मा जोगती होण्याची गोष्ट सोपी नव्हती. डॉक्टर आणि पुजारी यांना दाखवल्यानंतर मंजूनाथ यांच्यामध्ये ट्रांसजेंडर करणार्यांची सगळी लक्षणे दिसत असल्याचे कुटुंबीयांना लक्षात आले. १९७५ रोजी त्यांचे आई-वडील त्यांना होस्पत येथील हुलीगेयम्मा मंदिरात घेऊन गेले. तिथे जोगती होण्याची दीक्षा दिली जाते. जोगती म्हणजे लिंगपरिवर्तन करणारे स्वतःला देवी येलम्माशी विवाह झाल्याचे मानतात. ते देवीचे भक्त असतात. देवी येलम्माला उत्तर भारतात रेणुकादेवी नावाने ओळखली जाते. दीक्षा घेतल्यानंतर मंजूनाथ यांच्या कमरेखालील करदोडा कापून त्यांना मंगळसूत्र, स्कर्ट-ब्लाउज आणि बांगड्या देण्यात आल्या. तेव्हापासून मंजूनाथ यांना मंजम्मा जोगती असे नाव मिळाले.

विष प्राशन केले
द हिंदू बिझनेस लाइनशी बोलताना मंजम्मा यांनी सांगितले की, दीक्षा घेतल्यानंतर मंजूनाथ मंजम्मा जोगती झाले होते. घरातील मंजूनाथचे अस्तित्व नाहीसे झाले होते. आपला मुलगा गमावल्याचे दुःख आईला झाले होते. माझी आई अनेक दिवस घरात रडत होती. ती सारखी म्हणायची की मी माझा मुलगा गमावला आहे. माझा मुलगा आता मेला आहे. आईचे हे बोलणे मंजम्मा यांना सहन झाले नाही आणि एके दिवशी त्यांनी विष प्राशन केले. परंतु कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले आणि त्यांचा जीव वाचवला.

मानसिक आणि शारिरीक अत्याचार
प्रकृती बरी झाल्यानंतर मंजम्मा यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांना अन्न आणि निवार्याची सोय नव्हती. मंजम्मा भिक मागून आपले पोट भरत होत्या. त्यादरम्यान त्यांच्यावर सहा जणांना सामुहिक बलात्कार केला. भिक मागून मिळवलेले पैसेसुद्धा त्यांनी लुटून नेले. शेवटी आयुष्यात कोणासाठी आणि का जगावे असा प्रश्न त्यांच्या मनात आला. त्यांनी पुन्हा आत्महत्येचा निर्णय घेतला. परंतु एका रस्त्यावर जोगते नृत्य करणार्या बाप आणि मुलाला पाहून त्यांनी निर्णय बदलला.

जोगती नृत्याचा प्रवास
कर्नाटकमधील दावणगेरे बसस्थानकाजवळ एक वडील आणि मुलगा लोकनृत्य सादर करून नागरिकांचे मनोरंजन करत होते. वडील गाणे गात होते आणि मुलगा नृत्य करत होता. मुलगा फ्कत नृत्य सादर करत नव्हता, तर तो डोक्यावर हंडा ठेवून तारेवरची कसरतही करत होता. जमिनीवर पडलेले नाणे तोंडाने उचलत होता. यालाच जोगती नृत्य असे म्हणतात. दूर उभे असलेल्या नागरिकांमध्ये मंजम्मासुद्धा जोगती नृत्य पाहात होत्या. त्याच वडिलांकडून मंजम्मा यांनी नृत्य शिकण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दररोज मंजम्मा त्या व्यक्तीच्या झोपडीत जाऊन नृत्य शिकू लागल्या.

जोगती नृत्यू म्हणजे काय?
जोगप्पा नागरिक जोगती लोकनृत्य करतात. ट्रांस वुमेन हे पारंपरिक लोकनृत्य करतात. मंजम्मा जोगती या सुद्धा ट्रांस वुमेन आहेत. हे नृत्य उत्तर कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील काही भागात केले जाते. त्यांना नृत्याची आवड असल्याचे पाहून जोगप्पा यांनी त्यांना एका लोक कलाकारशी भेट घालून दिली. त्यांचे नाव कालव्वा होते. त्यांनी मंजम्मा यांना नृत्य करण्यास सांगितले. कालव्वा नृत्यामधील तज्ज्ञ होते आणि मंजम्मा नवीन नृत्य शिकणारी विद्यार्थी. इतक्या मोठ्या कलाकारासमोर कसे नृत्य करावे हा विचार करून त्या घाबरल्या. परंतु मंजम्मा यांनी त्यांच्यासमोर सुंदर नृत्य सादर केले. कालव्वा जसे धून बदलत होते तसे मंजम्मा नृत्य करत होत्या. त्यानंतर कालव्वा यांनी मंजम्मा यांना नाटकांमध्ये लहान-मोठ्या भूमिका देण्यास सुरुवात केली.

नृत्य बनली ओळख
मंजम्मा हळूहळू मुख्य भूमिका करू लागल्या. त्यांचे नाटक आणि नृत्य या दोन्ही मध्ये मन रमले. त्यांच्या नावावर आता शो होऊ लागले होते. मंजम्मा जोगती नृत्याची ओळख होऊ लागल्या होत्या.
त्यांनीच या नृत्याची सामान्य नागरिकांना ओळख करून दिली. डेक्कन हेराल्ड वृत्तपत्राशी बोलताना मंजम्मा म्हणाल्या, की खरे पाहिले तर मला खूप आवड होती म्हणून मी नृत्य शिकले नाही. भूक भागविण्यासाठी मी नृत्य शिकले.

जनपद अकादमीच्या अध्यक्ष
मंजम्मा सांगतात, की रस्त्यावर भिक मागणे किंवा सेक्स वर्करचा रस्ता निवडला असता तर आज मी जिवंत राहिले नसते. जोगती नृत्यामुळेच मी इतके पुढे येऊ शकले. जोगती नृत्य आणि जोगप्पा समाजाची प्रगती व्हावी असे मला वाटते. समाजाने माझ्यासाठी केले, आता मी या समाजासाठी काहीतरी करू इच्छिते. २००६ रोजी मंजम्मा जोगती यांना कर्नाटक जनपद अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. २०१० मध्ये कर्नाटक राज्योत्सव सन्मानाने त्यांना सन्मानित करण्यात आले. आज त्या कर्नाटक जनपद अकादमीच्या पहिल्या ट्रांसजेंडर अध्यक्ष आहेत. आतापर्यंत या पदावर फक्त पुरुषांचे वर्चस्व होते. कर्नाटकातील लोककला टिकविण्यासाठी १९७९ रोजी या संस्थेची स्थापना झाली होती.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कोरोनातून बरे झाल्यानंतर जिममध्ये जाताय? आधी हे जाणून घ्या

Next Post

नाशिक – जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ५३७; महानगरपालिका क्षेत्रात २३५ तर पंधरा तालुक्यात २८१ रुग्ण

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
carona 1

नाशिक - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ५३७; महानगरपालिका क्षेत्रात २३५ तर पंधरा तालुक्यात २८१ रुग्ण

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011