जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मी व माझी पत्नी संसाराला कंटाळून स्वखुशीने आत्महत्या करीत आहोत. त्यासाठी कुणालाही कारणीभूत अथवा जबाबदार धरू नयेस असे पोलिसांना फोनवरुन सांगत पाचोरा तालुक्यातील लोहटार येथील वृद्ध पाटील दांम्पत्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या फोननंतर पोलिसांनी थेट घटनास्थळ गाठले पण, त्याअगोदर या दांम्पत्याने विषारी द्रव सेवन केले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु या दोघांचा आज मृत्यू झाला. राज्य परिवहन महामंडळाचे निवृत्त कर्मचारी ईश्वर नामदेव पाटील (वय ७८) व त्यांच्या पत्नी प्रमिला पाटील (वय ७२) हे दांम्पत्याने ही आत्महत्या केली.
पाटील यांना दोन मुले, सुना, नातवंडे आहे. त्यांच्याकडे आदर्श परिवार म्हणून बघितले जात होते. पण, ८ जुलैला पहाटे चार वाजेच्या सुमारास ईश्वर पाटील यांनी पाचोरा पोलीस स्टेशनला फोन केला व पोलिसही हादरले. त्यांनी पाटील यांचे घर गाठले पण, तोपर्यंत या दांम्पत्याने विषारी औषध सेवन केले होते. त्यांना अस्वस्था वाटत असतांना पोलिसांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उपचार करून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. पण, दोघांचा मृत्यू झाला.