इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतीय शटलर पीव्ही सिंधूने रविवारी महिला एकेरीच्या फायनलमध्ये चीनच्या वांग झी यी हिच्यावर शानदार विजय नोंदवून सिंगापूर ओपन २०२२ चे विजेतेपद पटकावले. सिंधूने ११व्या क्रमांकाच्या वांग झी यीचा पराभव करून तिचे पहिले सिंगापूर ओपन जेतेपद आणि तिचे पहिले सुपर ५०० विजेतेपद पटकावले. दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूचे हे वर्षातील तिसरे विजेतेपद आहे.
यापूर्वी सिंधूने सय्यद मोदी इंटरनॅशनल आणि स्विस ओपनमध्ये दोन सुपर ३०० विजेतेपद पटकावले आहेत. या सामन्यात सिंधूने वांग झी यीचा २१-९, ११-२१ आणि २१-१५ असा पराभव केला. राष्ट्रकुल स्पर्धेपूर्वी या जेतेपदामुळे सिंधूचा आत्मविश्वास नक्कीच उंचावणार आहे.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1548559177177767937?s=20&t=7oWS8kowyophpABJOdgPrw
सिंधूने सामन्याची शानदार सुरुवात केली. पहिल्या सेटमध्ये तिने चीनच्या शटलरचा २१-९ अशा मोठ्या फरकाने पराभव केला, पण दुसऱ्या सेटमध्ये वांग झी यीने शानदार पुनरागमन करत सिंधूचा ११-२१ असा पराभव केला. तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात दोन्ही खेळाडूंमध्ये निकराची झुंज पाहायला मिळाली, मात्र सामन्याच्या अखेरीस सिंधूने वांग झी यीवर वर्चस्व राखण्यास सुरुवात केली आणि अंतिम सेट २१-१५ असा जिंकून विजेतेपद पटकावले.
सिंधू अंतिम सेटमध्ये ११-६ अशी आघाडीवर होती, परंतु चीनच्या शटलरने जोरदार पुनरागमन करत स्कोअर १२-११ ने नेला. यादरम्यान सिंधूने कोर्टाच्या मूल्यांकनात अनेक चुका केल्या, पण शेवटी या खेळाडूने दमदार पुनरागमन करत सामना जिंकला.
https://twitter.com/Media_SAI/status/1548556490172010496?s=20&t=4zqwpA1v4mqqRcC6wD4WfA
PV Sindhu Wins Singapore Open 2022 title today