शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आज पासून येळकोट येळकोट जय मल्हार…जेजुरी नंतर सर्वात मोठी यात्रा ओझरला

by Gautam Sancheti
डिसेंबर 7, 2024 | 12:24 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20241207 WA0196 1

सुदर्शन सारडा, ओझर
चंपाषष्ठीला ओझर येथील खंडेराव महाराज यात्रेला आज ७ डिसेंबर पासून प्रारंभ होत आहे.नाशिक जिल्ह्यातील ओझर गावाला लाभलेले वरदान म्हणजे येथील खंडेराव महाराज मंदिर. जेजुरी नंतर सर्वात मोठी यात्रा म्हणजे ओझरची यात्रा अशी ओळख पूर्वीपासून लाभलेली आहे.या निमित्त हजारोंच्या संख्येने भाविक या मध्ये सहभागी होतात. ‘सत्वाचा मल्हारी’ म्हणून पंचक्रोशीत त्याची ओळख आहे. या खंडेरायाची यात्रा तब्बल पाच दिवस भरते.आज शनिवार दिनांक ७ तारखेपासून यात्रेला प्रारंभ होणार असून या यात्रेचे विशिष्ट म्हणजे यात्रेचे द्वादश मल्हाररथ व बारा गाडे ओढण्यासाठी येथे देवाचा अश्व स्वत:हून येत असल्याची आख्यायिका आहे.

अश्वमिरवणुकीसोबतच देवाची पहिली पालखी निघते. देवदासींचे नृत्य, गोंधळ्यांची गीते, रणशिंगांचा नाद, सोबत यळकोट यळकोट जय मल्हार, खंडेराव महाराज की जय अशा जयघोषांनी वातावरण दुमदुमून जाते. यात्रेच्या पहिल्या दिवशी आख्खं गाव पिवळं होतं. हवेत भंडारा उधळला जातो. बाणगंगेतून दर्शन करून अश्व पुढे जातो. खंडेराव महाराजांचा जयघोष होतो व मल्हाररथ अश्वाच्या मदतीने मैदानावर पळविला जातो. कै. विष्णुपंत पगारांचा मानाचा मोंढा गाडा, सोनेवाडी, शेजवळवाडी, मधला माळीवाडा, सिन्नरकर – निंबाळकर- चौधरी, समस्त पगार, गवळी, रास्कर, भडके, वरचा माळीवाडा, भडके कदम व इतर बारा बलुतेदार शिंदे-चौधरी व अण्णा भडके यांचे बैलगाडी अशा बारा गाडयांना देवाचा हा ‘वारू’ जोडुन गोरज मुहुर्तावर तो हे बारा गाडे ओढून खऱ्या अर्थाने यात्रेला सुरूवात होते. ही ईश्वरी अनुभुती व हा थरार अनुभवण्यासाठी त्यावेळी लाखों आबालवृध्द भाविक गर्दी करतात. भंडाऱ्याची उधळण व ‘सदानंदाचा येळकोट’, ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ अशा मल्हाराच्या जय घोषाने अवघा परिसर दुमदुमतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिराच्या आवारात हजेरीचा कार्यक्रम होतो. यात तमाशातील कलावंत खंडेरायाची गाणी म्हणतात. त्याबदल्यात ग्रामस्थ त्यांना बक्षिसी देतात. हजेरीनंतर कुस्त्यांची दंगल होते.यंदा भव्य स्वरूपात कुस्त्यांचे आयोजन यात्रा कमिटी तर्फे करण्यात आले आहे. यात्रेच्या शेवटच्या दिवशी परंपरेनुसार संध्यासमयी देवांना पुन्हा पालखीत बसवून वाजत-गाजत आपापल्या स्थानी, मानकऱ्यांच्या गृही विराजमान करण्यात येते.

नगरपरिषद प्रशासनाने तयारी पूर्ण केली असून यात्रे साठी पोलिसांची विशेष कुमक तैनात केली आहे. सीसीटीव्ही ची नजर देखील यात्रेवर असणार असून त्यामुळे अनुचित प्रकारावर आळा बसेल.अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या यात्रोत्सवामुळे ओझरवासीयांसह जिल्ह्यातील भाविकांमध्ये उत्साह संचारला आहे.

यात्रेचा आनंद घ्यावा
ओझर नगरपरिषद प्रशासनाची तयारी पूर्ण पूर्ण झाली आहे.यात्रा निर्विघ्न पार पाडण्यासाठी मंदिरास यात्रा मैदानावर सीसीटिव्ही ची नजर राहील.पोलीस प्रशासनाचा देखील यात्रेसाठी चोख बंदोबस्त असेल. सर्व्हिस रोड वर कोणतीही दुकाने राहणार नाही.सर्व दुकानदारांना जागेची आखणी करून दिलेली आहे.दरवेळी प्रमाणे भाविकांनी प्रशासनास योग्य सहकार्य करून यात्रेचा आनंद घ्यावा.
किरण देशमुख, मुख्याधिकारी, ओझर नगरपरिषद.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकमध्ये ३० वर्षीय तरुणाचा खून…कोयता, लाठ्या, काठ्यांनी प्रहार करत केली हत्या

Next Post

विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनास प्रारंभ….विरोधी आमदारांनी शपथ न घेता केला सभात्याग

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Vidhan Sabha New 5 750x375 1

विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनास प्रारंभ….विरोधी आमदारांनी शपथ न घेता केला सभात्याग

ताज्या बातम्या

प्रातिनिधिक फोटो

भारतीय रेल्वे गणपती विशेष रेल्वेगाड्यांच्या ३८० विक्रमी फेऱ्या चालवणार

ऑगस्ट 22, 2025
IMG 20250820 WA0222 1

आज रेखाताई नाडगौडा यांच्या संकल्पनेतून साकारणार आम्ही मराठी नृत्याविष्कार…तीन दिवस रंगणार महोत्सव

ऑगस्ट 22, 2025
image002MFJ9

संसदेचे पावसाळी अधिवेशन संस्थगित…दोन्ही सभागृहात केली १५ विधेयके मंजूर

ऑगस्ट 22, 2025
Untitled 36

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ३४५ ठिकाणी पाळणाघरे सुरू होणार…मिशन शक्ती अंतर्गत मान्यता

ऑगस्ट 22, 2025
Untitled e1755825318843

जळगावमध्ये ट्रक व दुचाकीच्या भीषण अपघातात कबीर मठातील महंत प्रियरंजनदास जागीच ठार…सतंप्त नागरिकांचा रास्ता रोको

ऑगस्ट 22, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना नियोजित कामामध्ये अडथळे येण्याची शक्यता, जाणून घ्या,शुक्रवार, २२ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 21, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011