ओझर: येथील एचएएल कामगार संघटनेच्या त्रैवार्षिक निवडणुकीत अखेर सत्तांतर होऊन संजय कुटे व अनिल मंडलिक यांच्या श्री.आपला जागृती पॅनल विजयी झाले. तर समर्थशक्ती पॅनेलचे गणेश गवारे उपाध्यक्षपदी विजयी झाले. विश्वास पॅनलला एकही जागा मिळाली नाही.
येथील हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) मधील कामगार संघटनेच्या ३१ जागांसाठी २४ जून रोजी मतदान झाले. ३१४३ कामगारांपैकी २८९३ कामगारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. पहिली मतमोजणी श्री आपला जागृती पॅनलचे अनिल मंडलिक यांनी सर्वाधिक १४४५ मते मिळवून अध्यक्षपदी विजयी झाले त्यांनी विश्वास पॅनलचे पवन आहेर (९८८ मते) श्री समर्थशक्ती पॅनलचे जितेंद्र जाधव ( ४४२ मते ) यांचा पराभव केला. खजिनदारपदासाठी श्री आपला जागृती पॅनलचे प्रशांत आहेर (१५६५ मते) हे विजयी झाले त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार सुधीर राजगुरु ६८० मते तर अमोल जोशी ५१० मते मिळाली. सरचिटणीसपदासाठी श्री आपला जागृती पॅनलचे संजय कुटे (१६५४ मते) मिळवून विजयी झाले त्यांनी समर्थशक्ती गटाचे मावळते सरचिटणीस सचिन ढोमसे (१०३२ मते) गिरीजाकांत वलवे (१९१ मते) यांचा पराभव केला. मतमोजणी सुरू झाल्यापासून श्री आपला जागृती पॅनलने अध्यक्ष,उपाध्यक्ष तीन जागा,सहचिटणीस चार जागा,खजिनदार,व वीस कमिटी मेम्बर मध्ये आपला जागृतीची आघाडी कायम होती.निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करत विजय साजरा केला.यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री आपला जागृती पॅनलने असे मानले आभार
सन्माननीय कामगार बंधू आणि भगिनींनो……,
आज दि. २५ डिसेंबर, २०२१ झालेल्या एच.ए.एल. कामगार संघटनेच्या त्रैवार्षिक (२०२१-२४) निवडणूक मतमोजणीत कामगारांनी श्री आपला जागृती पॅनलला विक्रमी मतदान करत ऐतिहासिक विजय मिळवून दिल्याबद्दल सर्वच कामगार बंधू आणि भगिनींचे जाहीर आभार. या ऐतिहासिक विजयाने कामगारांनी आमच्यावर सोपवलेल्या जबाबदारीचे भान राखत, संपूर्ण कार्यकाळात कामगारांचे सर्वांगीण हित साधणारच, याची आम्ही ग्वाही देतो.श्री आपला जागृती पॅनलच्या ऐतिहासिक विजयाचे खरे शिल्पकार ठरलेल्या असंख्य ज्ञात – अज्ञात सर्व कामगारांचे तसेच पॅनल साठी झटणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून जाहीर आभार.
कामगार एकजुटीचा विजय असो. HAL एम्प्लॉईज युनियन जिंदाबाद…..श्री आपला जागृती पॅनल