दिंडोरी : मराठा विद्या प्रसारक समाजाच्या ओझर येथील कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये सुरू असलेल्या बी.व्होक (इलेक्ट्रिकल टेक्नॉलजी) या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या १२ विद्यार्थ्याची नाशिक येथील फॉक्स इंडिया प्रा. लि. या कंपनीमध्ये निवड करण्यात आली आहे. ओझर महाविद्यालयामध्ये बी.व्होक इलेक्ट्रिकल टेक्नॉलजी हा युजीसी व पुणे यूनिवर्सिटी मान्यता प्राप्त अभ्यासक्रम सन- २०१८-१९ पासून सुरू करण्यात आला आहे या अभ्यासक्रमाच्या पदवीच्या प्रथम बॅचचे हे विद्यार्थी आहेत.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन मवीप्र चे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते,सरचिटणीस निलिमाताई पवार, चिटणीस सुनील ढिकले,उपसभापती राघो अहिरे, संचालक प्रल्हादनाना गडाख, शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. काजळे, प्राचार्य डॉ .एस.एस. काळे, सेवक संचालक नानासाहेब दाते यांनी अभिनंदन केले आहे. या विद्यार्थ्यानी नाशिक बॉश ट्रेनिंग सेंटर तर्फे तेजस्विनी पावस्कर यांच्या मार्गदर्शना खाली नुकतेच ट्रेनिंग पूर्ण केले होते.या विद्यार्थ्यांमध्ये आकाश गोतरणे, आकाश पठाडे, हृषीकेश संकपाल, विशाल भंडारे, अनिकेत गायकवाड, संदेश देशमुख, कल्पना जाधव, पूजा वड, गौरव क्षीरसागर, धीरज निकम, रोहित गांगुर्डे,अयान खाटीक यांनी ट्रेनिंग पूर्ण केले होते.
यासाठी विभाग प्रमुख प्रा. निलेश खालकर, प्रा. संजय पवार, प्रा. सायली शिंदे, प्रा. स्वाती ढीकले यांनी विशेष परिश्रम घेतले.
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी प्रथम वर्ष बी. व्होक इलेक्ट्रिकल टेक्नॉलजीचे प्रवेश सुरू झालेले आहेत. सदर अभ्यासक्रमाला नोकरीच्या भरपूर संधी असल्याने विद्यार्थ्यानी प्रवेश घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांनी केले आहे.