ओझर – एका मुस्लिम शेतकऱ्यांकडून रविवारी ईदच्या प्रार्श्वभूमीवर काही जनावरे जप्त करण्यात आली. त्याच्या विरुद्ध जनावरांची हेळसांड प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या पोलीस कारवाईमुळे ओझरला ईद साजरी करतांना कुठल्याही प्रकारची कुर्बानी न देता ईद साध्या पध्दतीने साजरी करण्याचा निर्णय मुस्लिम समाजातील नागरिकांनी घेतला.
ऐन बकरी ईदच्या अगोदर पोलीस खात्याने मुस्लिम समाजातील कुरेशी नामक शेतकऱ्यांकडून त्यांच्या मळ्यातील गोठ्यातुन काही पाळीव जनावरे पकडून ते कत्तली करीता आणल्याचे सांगून सदर जनावरे पांजरपोळ या ठीकाणी जमा केले. त्यामुळे मुस्लिम समाजात नाराजी पसरली असून या निषेधार्थ बकरी ईदला जनावरांची कुर्बानी न देण्याचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयाची माहिती मुस्लीम समाजाच्या प्रमुखांनी ओझर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक रहाटे यांना दिली. यावेळी ओझरचे इतर धर्मिय नागरिकही उपस्थिती होते. यावेळी त्यांनी सांगितले की, ओझरकमध्ये हिंदु मुस्लिम जैन बौध्द समाजातील एकोपा चांगला असून कुठल्याही समाजातील धार्मिक भावनांचा आदर केला जातो. सर्व धर्म समभाव असल्यामुळे ओझरला कुठल्याही समाजातील धार्मिक भावना दुखावल्या जात नाही. त्यामुळे ओझरकरांच्या वतीने आमचा एकोपा असाच राहील अशी ग्वाही देवुन मुस्लिम बांधवांना बकरीदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे प्रदेश अध्यक्ष रविंद्रदादा जाधव, ओझर ग्रा.पं.सदस्य प्रशांत अक्कर, पं.स.सदस्य नितिन पवार, रिपाई जिल्हाउपाध्यक्ष प्रदीपनाना गांगुर्डे, बाबा पठाण, शेखर असोलकर, आदींसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.