शिवसेनेची कामे तळागाळात पोहचवा : स्नेहलताई मांडे
ओझर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना काळातही समर्थपणे महाविकास आघाडीची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहे. त्यांच्याच निर्देशानुसार सुरू झालेल्या शिवसंपर्क अभियानात शिवसेनेची कामे तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवा, असे आवाहन दिंडोरी लोकसभेच्या महिला आघाडी संपर्कप्रमुख स्नेहलताई मांडे यांनी केले. आज निफाड तालुका शिवसेनेच्यावतीने महिला आघाडी संपर्कप्रमुख स्नेहलताई मांडे व माजी आमदार अनिल कदम यांच्या हस्ते ओझर येथे शिवसंपर्क अभियानास प्रारंभ करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिल कदम होते. यावेळी व्यासपीठावर जि.प अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, महिला आघाडीच्या रंजनाताई नवाळकर, संगीता खोदाना, मंगला भास्कर, जिल्हाप्रमुख सुनील पाटील, निलेश पाटील, सभापती सुलभा पवार, जि.प सदस्य दीपक शिरसाठ, नगरसेवक अनिल कुंदे, मुकुंद होळकर, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे, संजय कुंदे, देवदत्त कापसे, प्रदीप अहिरे, केशव बोरस्ते, सुधीर कराड, गोकुळ गीते, अशपाक शेख, शहाजी राजोळे, शंकर संगमनेरे, बाळासाहेब चारोस्कर, प्रकाश महाले, आशिष शिंदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रारंभी छत्रपती शिवराय व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचे पूजन स्नेहलताई मांडे व सभापती सुलभाताई पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
ओझर शहरातील मेडिकल सेवा देणाऱ्या कोविड योद्ध्यांचा सन्मान यावेळी ओझर शिवसेनेच्यावतीने करण्यात आला. अभियानात विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती तालुकाप्रमुख सुधीर कराड यांनी दिली. माजी आमदार अनिल कदम व जिप अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी उपस्थित शिवसैनिकांना सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमास बापू जाधव, प्रकाश वाटपाडे, शरद कुटे, दत्तू भुसारे, नितीन काळे, प्रकाश महाले, प्रशांत पगार, महेश शेजवळ, अमित कोळपकर, स्वप्नील कदम, सुनील वाघ आदिसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन खंडू बोडके-पाटील यांनी तर प्रास्ताविक सुधीर कराड, आभार प्रकाश कडाळे यांनी मानले.