ओझर :येथील अनेक वर्षांपासून रखडत पडलेल्या मुंबई आग्रा महामार्ग लगत जिल्हा परिषद शाळेचे काम एचएएल तर्फे पूर्ण झाले त्याचे उदघाटन महाप्रबंधक व्ही.शेषगिरी राव यांच्या हस्ते करण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून निर्लेखीत झालेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत भग्न झाली होती.शाळेतील मुलांनी प्रचंड हाल अपेष्ठा सहन करत शिक्षण घेत होते.शाळेच्या पडित जागेवर सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी लहान विद्यार्थ्यांनी मोकळ्या जागेत तिरंगा फडकवला.यात माजी शिक्षकांना अश्रू अनावर झाले होते.त्यानंतर काही संस्थांनी यासाठी पुढाकार घेत मदतीचा हात देखील पुढे केला. एचएएलने सीएसआर फंडातून शाळा बांधून देण्याचे मान्य केले.अखेरीस वर्षभराच्या काळात दुमजली इमारत उभी राहून त्याचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते पार पडले.
यावेळी बोलताना शेषगिरी राव यांनी एचएएलच्या स्थानिक विकास निधीतून ज्ञानमंदिर उभे करण हे आमचे कर्तव्य असून या ज्ञानमंदिरातून भावी पिढी देशाच नाव उज्वल करल असा विश्वास व्यक्त केला. येथील जिल्हा परिषदेच्या मराठी मुले शाळा नं २च्या इमारतीच्या उद्घाटना प्रसंगी ते बोलत होते.यावेळी व्ही.शेषगिरी राव,माजी आमदार अनिल कदम,नगरपरिषदचे सीईओ दिलीप मेनकर,दीपक सिंघल,साकेत चतुर्वेदी,सालेशकुमार मेहता,शिरीष भोळे, प्रदीप कुमार,संदीप बर्मन,सचिन ढोमसे,जितू जाधव,पांडुरंग आहेर,मुख्याध्यापक रजनी सोनवणे,प्रास्तविक योगेश्वरी खैरनार यांनी केले.