रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ओझर कचरा डेपोतील कुबट धुराने हजारो नागरिक त्रस्त…प्रशासनाचे दुर्लक्ष,अनेकांना श्वास घेण्यास त्रास

by India Darpan
जानेवारी 28, 2025 | 12:04 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20250128 WA0171

सुदर्शन सारडा, ओझर
ओझर येथे असलेल्या कचरा डेपोतील ढीग जिरण्यासाठी रात्रीच्या वेळी जाळण्याच्या प्रयोगात हजारो नागरिक त्रस्त झाले आहे. ढीग मधून सुटणाऱ्या घाण वासामुळे गावातील अनेक नागरिकांना श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने अनेकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.त्यात सर्वच प्रकारचा कचरा येथे एकत्र करून डंप करून जाळला जात असल्याने तो धूर अत्यंत विषारी ठरत आहे.त्यात अनेक नागरिकांना गंभीर आजार जडण्याची भीती व्यक्त झाली असून त्याचा मोठा धसका ओझरकरांनी घेतला आहे.धुर आणि कुबट वासामुळे सुखाच्या झोपेत दुर्गंधीयुक्त प्राणवायू मिळत असून अनेकांना गंभीर आजार जडण्याची भीती निर्माण झाली आहे.या गंभीर मुद्द्याकडे स्थानिक प्रशासनाने साफ दुर्लक्ष्य केल्याचे दिसते.

सध्या ओझर येथे सर्वाधिक चर्चेचा मुद्दा उपस्थित होतोय तो म्हणजे कचरा जाळण्यामुळे होणाऱ्या त्रासाचा.येथे जुन्या सायखेडा रोड जवळील अनुसया पार्क ला लागून असलेल्या कचरा डेपोच्या दुर्गंधीने अनेक जण हैराण झाले आहे.त्यामुळे परिसरात आजारपण वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.ओझर येथे बाणगंगा नदी किनारी मारुती वेस स्मशानभूमी मागे व जुन्या सायखेडा रोडला लागून कचरा डेपो असून गावातील तसेच उपनगरातील सर्व कचरा हा घंटागाडीने तेथे आणून टाकला जातो.परंतु गावचा वाढता विस्तार व दररोज हजारो किलो जमा होत असलेला ओला व सुका कचरा हा सदर ठिकाणी आणून टाकला जात असताना त्याची विल्हेवाट रात्री जाळून लावण्यात येत असल्याने तो नागरिकांच्या जीवावर उठत आहे.

ओला सुका कचरा एक होत असल्याने जागेची प्रचंड कमतरता होत आहे. कचरा डेपोला लागूनच वसाहत आहे तर नदी पलीकडे शेती व शेलार,शिंदे,कदम वस्ती आहे. या आधीही जेसीबीच्या सहाय्याने डम्पिंग करत असताना त्याची प्रचंड दुर्गंधी नागरिकांना सहन करावी लागली होती.सध्या सायंकाळनंतर दररोज कचरा जाळण्याचे प्रमाण वाढल्याने पसरत असलेल्या धुराचे लोळ दुर्गंधी मुळे नागरिकांचे घराबाहेर पडणे मुश्किल झाल्याने अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.महत्वाची बाब म्हणजे सार्वजनिक शौचालय सदर ठिकाणी असल्याने कुबट वासाचा सामना लहान मुलांपासून तर वयोवृद्ध लोकांना देखील करावा लागत आहे.सदर प्रकरण गंभीर असताना सुद्धा प्रशासन नागरिकांच्या आरोग्याशी का खेळत आहे असा सवाल सामान्य नागरिकांनी व्यक्त केला आहे.

मुख्याधिकारी मात्र बंद खोलीत
दरम्यान ओझरला प्रशासकराज असल्याने या गंभीर समस्येचा गांभीर्यपूर्वक विचार करणे अत्यंत गरजेचे असताना येथील मुख्याधिकारी तथा प्रशासक मात्र पक्क्या खोलीत बसून प्रशासन चालवत आहे.कचऱ्यामुळे अनेकांचे आयुष्य आजारपणात जाण्याची भीती असूनही त्यांनी या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम आजाराच्या रुग्णात वाढ…केंद्र सरकारकडून उच्चस्तरीय बहु-शाखीय पथक महाराष्ट्रासाठी नियुक्त

Next Post

जैन समाजाच्या महोत्सवात स्टेज कोसळला, ७ जणांचा मृत्यू, ८० जण जखमी…उत्तर प्रदेशातील घटना

India Darpan

Next Post
Untitled 33

जैन समाजाच्या महोत्सवात स्टेज कोसळला, ७ जणांचा मृत्यू, ८० जण जखमी…उत्तर प्रदेशातील घटना

ताज्या बातम्या

IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

जून 22, 2025
World Olympic Day chief Guest welcome by Nashik Sports Persons 1

पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू जफर इक्बाल यांचे नाशिकमध्ये आगमन…

जून 22, 2025
rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
Untitled 73

या जिल्ह्यासह पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट; राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011