ओझर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गेल्या अडीच वर्षापासुन आर्थिक अडचणीत असलेल्या येथील सिध्दीविनायक नागरी सहकारी पतसंस्थेचे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे नागरी सहकारी पतसंस्थेत विलिनीकरण करण्याचा ठराव ४० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजुर करण्यात आला संस्थेचे ऑ सेक्रेटरी प्रशांत शेळके यांनी ठराव मांडल्यानंतर यावर सर्वसमावेशक चर्चा होऊन सभासदांनी हा ठराव बहुमताने मंजुर केला.
संस्थेची चाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन प्रभाकरपंत आढाव यांच्या अध्यक्षतेखाली निर्मल लाॅन्स येथे आयोजित करण्यात आली होती व्यासपीठावर व्हा चेअरमन अरविंद कदम ऑ.सेक्रेटरी प्रशांत शेळके संचालक बबन कासार बाळकृष्ण पगार मुक्तार कुरेशी सुनील पाटील गणेश सिन्नरकर राजेंद्र भवर मंगला नाईक सुलोचना कदम कृष्णा मंडलिक सचिन म्हैसधुणे पंडीत पल्हाळ मुख्यकार्यकारी अधिकारी खंडेराव शेटे व्यवस्थापक विजय कदम उपस्थित होते.
प्रारंभी मागील तहकुब सभा घेण्यात आली विषयपत्रिकेवरील विषयांना मंजुरी देण्यात आली सभासद महेश गाडगे यांनी संस्थेत झालेल्या अपहारा बाबत तत्कालीन लेखापरीक्षकावर कारवाई करण्याची मागणी करत संस्थेचे लेखापरीक्षक बदलण्याची सुचना केली प्रशांत पगार यांनी विलिनीकरणाचा मसुदा तयार करण्याची मागणी केली भुषण धनवटे यांनी विलिनीकरणाचा निर्णय विचारपुर्वक घ्यावा असे सांगितले सुर्यभान ठाकरे यांनी ठेवीदार हे प्रचंड त्रस्त झालेले असुन त्यांना ठेवीची रक्कम मिळण्यासाठी विलिनीकरण हि काळाची गरज असल्याचे सांगत विलिनीकरणास सभासदांनी मंजुरी देण्याचे आवाहन केले ऑ.सेक्रेटरी प्रशांत शेळके यांनी संस्थेची विलिनीकरणा बाबतची भुमिका विषद करून त्याची मसुद्याची माहीती दिली.यावेळी बहुतांश सभासदांच्या मंजुरी नंतर ठराव मंजुर करण्यात आला सभेस मारूती ग्रामिण पतसंस्थेचे चेअरमन शिवाजीभाऊ पगार रामनाथ वाबळे सुरेश कदम भास्करराव तासकर नंदकुमार कदम अरूण पवार राजेंद्र कदम अरूण रास्कर दिलीप कदम श्रीराम आढाव धमेंद्र जाधव सचिन आढाव सुनील कदम आदि उपस्थित होते.