ओझर :राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे माजी अध्यक्ष तथा मविप्रचे नेते डी.बी.मोगल यांनी येत्या मविप्र निवडणुकी संबंधी मेळावा घेत रणशिंग फुंकले.पवार घराण्याचे जावई असलेले मोगल यांनी नितीन ठाकरे गटाकडून उमेदवारी करणार असल्याचे जाहीर केल्याने पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे. कसबे सुकेने येथील मटाले मंगल कार्यालय येथे मविप्र निवडणुकीत उमेदवारी संदर्भात डी.बी मोगल गटाचा मेळावा संपन्न झाला.जिल्हाभरातून आलेल्या त्यांच्या समर्थकांकडून उमेदवारी करण्याचा एकमुखी निर्णय झाला.यावेळी बोलताना मोगल यांनी विविध विषयांवर बोलत आपली भूमिका मांडत सद्यस्थितीत सुरू असलेल्या कारभारावर व होणाऱ्या अन्यायाविरुध्द कवितेतून आपली भूमिका स्पष्ट केली.ॲड.नितीन ठाकरे यांनी पॅनल मध्ये उमेदवारी वर शिक्कामोर्तब करत मविप्रत सामान्य सभासदांच्या होत असलेल्या पिळवणूक संबंधी सुरू असलेल्या अर्वाच्च वागणूक बाबत कारभारविरोधात चौफेर टीका केली.
कोविड काळात भारतातील सर्वाधिक मृत्यू दर हा आडगाव मवीप्र रुग्णालयात झाला असून शासनाकडून पुरवठा केलेल्या औषध साठ्यात,सुरू असलेल्या बांधकामात मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप करत संस्थेत आज तीन सरचिटणीस काम करत असून सामान्य माणसांची मोठी परवड होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विजय गडाख,बाळासाहेब पिंगळे,प्रवीण जाधव,विलास बोरस्ते,अर्जुन बोराडे,डॉ.चैताली कदम,शंकरराव ढिकले,बाळासाहेब जाधव,साहेबराव दवंगे,बाजीराव भंडारे,उपसरपंच धनंजय भंडारे,सचिन मोगल,जगन्नाथ ढिकले,श्याम मोगल यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी मदनकाका पवार,बाबुराव तांबे,सुरेश ढोकळे,कृष्णाजी भगत, रमेश पिंगळे,मोहन पिंगळे,अविनाश जाधव,मुकुंद गवळी,अनिल बोरस्ते,काळूमामा कटाळे,विजय गवळी,लालू वाटपडे,माणिकराव बोरस्ते,आनंदराव भंडारे,अशोक माळोदे,ॲड.लक्ष्मण लांडगे,लक्ष्मीकांत कोकाटे,माणिकराव कुंदे, चाटोरीचे सरपंच खेलुकर,दीपक कदम आदींसह मविप्रचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन प्रवीण घुमरे यांनी तर आभार अविनाश मोगल यांनी आभार मानले.
कवितांनी आपल्या भावनांना दिली वाट
द्राक्ष बागायतदार संघाचे माजी अध्यक्ष व शरद पवारांचे निकटवर्तीय असलेले डी.बी मोगल हे कृषितज्ञ असून डॉ. वसंत पवार घराण्याचे जावई आहेत. डॉ.पवार यांचे एकनिष्ठ सहकारी असलेल्या मोगल यांनी वसंत पवारांच्या पश्चात माय लेकांनी एककल्ली कारभार सुरू केल्याचा आरोप करत कर्मवीरांनी उभी केलेली संस्था खासगीकरणाकडे जात असल्याचा आरोप करत त्यास उघडपणे विरोध केला. वाटा सापडत जातील, तुम्ही शोधत जा,माणसं बदलत जातील,तुम्ही स्विकारत जा,परिस्थिती शिकवत जाईल, तुम्ही शिकत जा,येणारे दिवस निघून जातील,तो क्षण जपत जा,विश्वास तोडून अनेक जातील, तुम्ही सावरत जा प्रसंग परीक्षा घेत जाईल,तुम्ही क्षमता दाखवत जा या कवितांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.