नाशिक – ओझर टाऊनशिप येथील बाणगंगानगर केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्राथमिक शिक्षिका नलिनी बन्सीलाल आहिरे यांना राज्यस्तरीय कोवीड योद्धा समाजरक्षक पुरस्कार २०२१ हा ऑनलाईन पद्धतीने ९ मे या दिवशी सायंकाळी साडेसहा वाजता ऑनलाईन वितरण करण्यात आला. मुंबईच्या अखिल महाराष्ट्र पत्रकार पत्रलेखक संघटनेच्यावतीने हा पुरस्कार देण्यात आला संस्थेचे अध्यक्ष कृष्णाजी जगदाळे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.विजयराज शहा हे होते.
कोरोना काळातदेखील नलिनी आहिरे यांनी संपूर्ण वर्षभर ऑनलाइन पद्धतीने असंख्य लहान मुलांना बोलक्या बाहुल्याद्वारे अध्यापन केले तसेच बोलक्या बाहुल्याद्वारे शिक्षक आपल्या दारी या उपक्रमाचा संपूर्ण महाराष्ट्रभर बोलबाला झाला. बोलक्या बाहुल्याद्वारे आहिरे यांनी कोरोना विषाणू काय आहे covid-19 आजार आजार कसा होतो घ्यावयाची काळजी वापरावयाची त्रिसूत्री, कोरोना पेशंट सिरीयस कसा होतो, लसीकरण का करावे ,लसीकरणाचे फायदे अशा विविध विषयांवर व्हिडिओ तयार करून प्रसारमाध्यमांद्वारे जनसामान्यांपर्यंत जनजागृती केली. संपूर्ण महाराष्ट्रभर बोलक्या बाहुल्या यांनी कोरोनाविषयक महत्त्वपूर्ण अशी मनोरंजनात्मक, आनंददायी पद्धतीने महत्त्वाची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवली. तसेच करुणा जनजागृती वर विविध कवितालेखन सुद्धा केले. या कवितांद्वारे जनजागृती केली.
आहिरेच्यां या कार्याबद्दल त्यांना हा राज्यस्तरीय कोरोना योद्धा समाजरक्षक महासन्मान पुरस्कार वर्ष २०२१-२०२२ साठी देण्यात आला. याबद्दल जिल्हा परिषद नाशिकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड ,शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर , जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर ,निफाड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी केशव तुंगार ,चौधरी मॅडम, शिक्षण विस्तार अधिकारी कैलास बोरसे, ओझर टाऊनशिप केंद्राच्या केंद्रप्रमुख नूतन पवार शाळेचे मुख्याध्यापक संजय खंडू पवार , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष .रामदास पवार व बाणगंगानगरचे समस्त गावकरी यांनी त्यांचे कौतुक केले.