ओझर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अवैधरित्या विदेशी मद्याची वाहतुक करणाऱ्या इसमांना मुद्देमालासह २०२३ साली पकडण्यात आले होते. त्यात १८ लाख रुपयांचा (विदेशी मद्य) मुद्देमाल ओझर पोलिसांतर्फे जप्त करण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशाने अभिलेखावरील सदर मुद्देमालाची पंचांसमक्ष विल्हेवाट (नाश करण्यात आला) लावण्यात आली
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या १०० दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमा अंतर्गत नाशिक ग्रामिण विभागा पोलिस अधिक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधिक्षक आदित्य मिरखिलकर उपविभागिय अधिकारी हरिष खेडकर यांचे सुचनेप्रमाणे ओझर पोलीस स्टेशन येथे जप्त मुद्देमाल मधील १८ लाख रुपये किंमतीचे विदेशी मद्य नाश करण्याचे दिवाणी व फौजदारी न्यायालय पिंपळगाव बसवंत यांचा आदेश झाल्याने पोलीस स्टेशन आवारात दोन पंचा समक्ष सदर मुद्देमाल नाश करण्यात आला.
तसेच पोलीस स्टेशन अभिलेखावर असलेले कालबाह्य रेकॉर्ड नाश करण्यात आले.या वेळी अद्विता शिंदे. पोलीस उप अधिक्षक (प्रभारी अधिकारी ओझर पोलीस स्टेशन),राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक वाणी,पोलिस हवालदार सुभाष गोडसे,दिपक गुंजाळ,चेतन सवंत्सकर, राजेंद्र डंबाळे दिपक गुंजाळ, विलास बिडगर, आदी उपस्थित होते.