ओझर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पेंन्शनचे पैसे मागितले म्हणुन झालेल्या वादात पती व त्याच्या प्रेयसी ढकलून दिल्याने आईचा मुत्यु झाल्याची फिर्याद मयत महिलेच्या मुलीने ओझर पोलीसठाण्यात दिल्यानंतर पोलीसांनी दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. दरम्यान पिंपळगाव न्यायालयाने त्यांना २६ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या बाबतची माहीती अशी की, रजनी प्रकाश वालदे वय ५० रा. गड्डीगोदाम गौतमनगर नागपुर या आपल्या मुली मुलासोबत सोबत रहातात त्यांचे पती प्रकाश तुकाराम वालदे वय ६० जवुळके शिवार ता. दिंडोरी येथे रहातात. आपले पती एका महिलेसोबत मानस अपार्टमेंट एअरपोर्ट रोड दहावा मैल ओझर येथे रहात असल्याची माहिती रजनी यांना मिळाल्यानंतर त्या आपली मुलगी काजल हिच्या सोबत १५ सप्टेंबर रोजी ओझर येथे आल्यावर त्या वर नमूद पत्त्यावर गेल्यावर तेथे त्यांना त्यांचे पती प्रकाश वालदे हे मंदाकिनी गांगुर्डे या महिलेसोबत आढळून आले. यावेळी रजनी यांनी घर खर्चासाठी पैसे का देत नाही याचा जाब आपल्या पतीला विचारला असता दोघांमध्ये शाब्दिक चकमक होत याचे पर्यावसन झटापटीत झाले. प्रकाश व त्यांची प्रियेसी मंदाकिनी यांनी ढकलुन दिल्याने त्या किचन ओट्यावर पडुन त्यांच्या डोक्यास मागील बाजुने जबर मुका मार लागुन उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यु झाला.
या बाबत मयत रजनी यांच्या मुलगी काजल प्रकाश वालदे हिच्या फिर्याद वरून पोलीसांनी प्रकाश वालदे व त्याची प्रियेसी मंदाकिनी गांगुर्डे यांच्या रजनी यांच्या मुत्युस कारणीभूत ठरल्याच्या कारणाने भारतीय न्याय संहिता २०२३ चे १०५ ३(५) ११५ ३५२ अंन्वये गुन्हा दाखल केला असुन या प्रकरणी दोघांना अटक केली असुन न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून अधिक तपास ओझर पोलीस करीत आहेत.