नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ओयो हॉटेल्सचे संस्थापक आणि सीईओ रितेश अग्रवाल लग्नरुपी बेडीत अडकणार आहेत. या निमित्त त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट त्यांना लग्नाचे निमंत्रण दिले. या खास भेटीचे फोटोदेखील त्यांनी इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर शेअर केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीबद्दल रितेश अग्रवाल यांनी ट्वीट करून लिहीले आहे की,‘माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने आम्ही एका नवी सुरुवात करत आहोत. ज्या उत्साहाने त्यांनी आमचे स्वागत केले, त्याचे शब्दात वर्णन करता येणार नाही. उत्तर प्रदेशमधील त्यांच्या महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीकोनाने माझी आई प्रेरित होऊन त्यांना भेटण्यास उत्सुक होती. तुमचा मौल्यवान वेळ आणि शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद.’ पुढच्या महिन्यात अग्रवाल विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती आहे. टाइम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, त्यांच्या लग्नानंतर राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील एका ५-स्टार हॉटेलमध्ये रिसेप्शन होणार आहे.
फेलोशिपच्या पैशातून ओयोची स्थापना
रितेश अग्रवाल या तरुण उद्योजकाचा जन्म ओडिशा राज्यातील मारवाडी कुटुंबात झाला आणि २०११ मध्ये कॉलेजच्या अभ्यासासाठी ते दिल्लीला गेले. दोन वर्षांनी त्यांनी कॉलेज सोडले. यानंतर फेलोशिपमध्ये मिळालेल्या पैशातून त्यांनी २०१३ मध्ये ओयो लाँच केले.
१८०हून अधिक देशात २५०० ओयो हॉटेल्स
आज कंपनी केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर सर्वात यशस्वी हॉस्पिटॅलिटी कंपनी म्हणून उदयास आली आहे. अलीकडेच, अग्रवाल यांनी खुलासा केला की, ओयो हॉस्पिटॅलिटी चेन इंडोनेशियातील सर्वात मोठे हॉस्पिटॅलिटी टेक प्लॅटफॉर्म झाली आहे. आज १८०हून अधिक शहरांमध्ये २,५०० हून अधिक विशेष ओयो हॉटेल्स उपलब्ध आहेत.
1/ With the blessings of माननीय Pradhan Mantri @narendramodi ji, we are all set for a new beginning. Words cannot express the warmth with which he received us. pic.twitter.com/CVx7Nzgyr3
— Ritesh Agarwal (@riteshagar) February 19, 2023
OYO Hotels Founder Ritesh Agrawal Wedding Invitation