नाशिक – शहरातील वाढते कोरोना रुग्ण संख्या बघता सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना बेड मिळण्यात अडचणी येत आहेत. हीच बाब लक्षात घेऊन नाशिक महापालिकेने योग्य ती कार्यवाही सुरू केल आहे. याचाच एक भाग म्हणून शहरात ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर आणि आयसीयु बेड वाढविण्यात आले आहेत.
महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी एकूण १९९ बेड वाढविण्यात आले आहेत. त्यात १४९ ऑक्सिजन बेड, २२ आयसीयु बेड आणि नव्याने २८ व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे आणि सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत शेटे यांनी दिली आहे. खाडे आणि शेटे यांच्या पथकामार्फत दैनंदिन रुग्णालयांचा सर्व्हे करून सी बी आर एस सिस्टिम अपडेट करण्याचे कामकाज सुरू आहे. तसेच नव्याने रुग्णालयातील बेड संख्या वाढविण्याचे कामकाज देखील सुरू आहे.
महापालिका प्रशासनाने आवाहन केले आहे की, कुठल्याही बाबतीत घाबरून जाऊ नये. बेड मिळत नसल्यास नाशिक मनपाच्या 9607623366 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिने केले आहे.