नवी दिल्ली – देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत ऑक्सिजनच्या तुटवड्याची स्थिती अतिशय गंभीर असल्याची बाब समोर येत आहे.
२० मृत्यू, २००चा जीव टांगणीला
एकट्या जयपूर गोल्डन हॉस्पिटलमध्येच ऑक्सिजनअभावी २० रुग्णांचा जीव गेला आहे. तर, याच हॉस्पिटलमध्ये सध्या २०० कोरोना बाधित ऑक्सिजनवर अवलंबून आहेत. तर हॉस्पिटलकडे वेळ अर्ध्या तासाचाच ऑक्सिजन साठा शिल्लक असल्याची माहिती जयपूर गोल्डन हॉस्पिटलचे डी के बालुजा यांनी सांगितले आहे. त्यामुळे या सर्व रुग्णांचा जीव टांगणीला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
रुग्णांना बळजबरी डिस्चार्ज
सरोज हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने आम्ही एकाही रुग्णाला अॅडमिशन देत नाही. उलट आम्हीच एमच्याकडील रुग्णांना डिस्चार्ज देत असल्याचे हॉस्पिटलने स्पष्ट केले आहे.
आयसीयु बेड फुल्ल
येथील सर्वात मोठ्या लोकनेते जयप्रकाश नारायण हॉस्पिटलमध्ये आयसीयु बेड फुल्ल झाले आहेत. त्यामुळे आगामी ४ ते ५ दिवस आम्हाला आयसीयुमध्ये नवीन रुग्ण भरती करता येणार नाही. ऑक्सिजनचा पुरवठा अद्यापही कमी आहे. आमच्याकडे काही गंभीर रुग्ण आहेत त्यांना ऑक्सिजन पुरवण्याला आम्ही प्राधान्य देत आहोत, असे हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले आहे.
https://twitter.com/ANI/status/1385817586626035720
https://twitter.com/ANI/status/1385822095955808257
https://twitter.com/ANI/status/1385837609826410496